शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Corona Virus in Yawatmal; १४ दिवस घरात राहिले आणि गावभर बदनाम झाले; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:57 IST

एक सुशिक्षित तरुण स्वत:हून क्वारंटाईन झाला. पण गावकऱ्यांनी त्याला चक्क कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली. ही अफवा आजूबाजूच्या गावातही पसरली. त्यामुळे अख्खे कुटुंबच बहिष्कृत झाले.

ठळक मुद्देवैष्णोदेवीहून परतलेले कुटुंब गावात बहिष्कृतकोरोनाची करामत

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परगावातून आलेल्या प्रत्येक माणसाला क्वारंटाईन राहण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना आहे. अनेक जण ती सूचना अव्हेरून गावभर फिरत आहेत. तर दुसरीकडे एक सुशिक्षित तरुण स्वत:हून क्वारंटाईन झाला. पण गावकऱ्यांनी त्याला चक्क कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली. ही अफवा आजूबाजूच्या गावातही पसरली. त्यामुळे अख्खे कुटुंबच बहिष्कृत झाले. आरोग्य ठणठणीत असूनही त्याच्याशी साधे बोलणेही लोकांनी बंद केले.कोरोना साथीमुळे ग्रामीण भागात पसरलेल्या विषारी साईड ईफेक्टचे हे उदाहरण आहे यवतमाळ जिल्ह्यातील मुसळ गावचे. कळंब तालुक्यातील हे छोटेसे गाव. येथील संदीप भोयर हा तरुण पत्नी सुवर्णा आणि मुलगी परीला घेऊन १३ मार्च रोजी वैष्णोदेवीला दर्शनासाठी गेला होता. हे कुटुंब जनता कर्फ्यूच्या एक दिवस आधी म्हणजे २१ मार्चला गावात परतले. मात्र जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन संदीपने स्वत:च क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने स्वत:ची आरोग्य तपासणीही करून घेतली. कोणतीही लक्षणे नसूनही तो १४ दिवस घरात राहिला.एकीकडे शासनाच्या सूचना अनेक जण पाळत नसताना संदीपने समजदारी दाखविली. पण त्याचा हाच समंजसपणा गावकऱ्यांच्या मनात गैरसमज निर्माण करणारा ठरला. संदीप वैष्णोदेवीहून आला तेव्हापासून अजिबात घराबाहेर निघत नाही, म्हणजे त्याला नक्कीच कोरोनाची लागण झाली आहे, असा पक्का समज गावकऱ्यांनी करून घेतला. गावकºयांनी त्याच्याशी बोलणे सोडले. त्याच्या कुटुंबावरच जणू बहिष्कार टाकला.या प्रकाराने संदीपचे आणि भोयर परिवाराचे सामाजिक जीवनच संपुष्टात आले. अखेर तो पुन्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना भेटला. पुन्हा तपासणी करून घेतली. त्याला कोरोनाचीच काय कोणत्याच आचाराची लक्षणे आढळली नाही. मग त्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनाच विनंती केली, माझ्यासोबत गावात या आणि लोकांना समजावून सांगा. शेवटी मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी मनोज पवार, गावातील आशा सेविका विजया सोनोने, तलाठी भूमिका विथळे आणि गावचे पोलीस पाटील राजेंद्र भिसे हे संदीपसोबत गावात पोहोचले. चौकात संदीपला उभे ठेवून संपूर्ण गावकऱ्यांना गोळा करण्यात आले. पवार यांनी थेट संदीपच्या खांद्यावर हात ठेवून लोकांना आवाहन केले, संदीपला कोरोना नाही, त्याला अशा पद्धतीने बहिष्कृत करणे योग्य नाही. उलट तुमच्या काळजीपोटी तो स्वत: क्वारंटाईन झालेला असताना तुम्हीच त्याला रुग्ण ठरवून वाळीत कसे काय टाकता? यावेळी मुसळ गावातील जमलेल्या सर्व महिला-पुरुषांनी आपली चूक कबूल करून संदीप आणि त्याच्या कुटुंबाशी पुन्हा एकदा नाते जोडले.पोलीस पाटलांनी वेळीच घेतली दखलसंदीप भोयर यांच्या कुटुंबावर कोरोनाच्या धास्तीने गावाने बहिष्कार टाकल्याची बाब लक्षात येताच पोलीस पाटील राजेंद्र भिसे, आशा सेविका विजया सोनोने यांनी तातडीने ही माहिती आरोग्य विभागापर्यंत पोहोचविली. त्यानंतर आरोग्य विभागाने संदीपचे निर्दोषत्व संपूर्ण गावापुढे सिद्ध केले. त्यामुळे एका निरोगी कुटुंबावरचे बहिष्काराचे संकट टळले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस