गणेश धर्माळे यांना राज्यस्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST2021-07-15T04:28:44+5:302021-07-15T04:28:44+5:30

पुसद : तालुक्यातील श्रीरामपूर येथील मातोश्री सुभद्राबाई जिल्हेवार विद्यालयाचे शिक्षक, ग्रामगीताचार्य गणेश धर्माळे यांना अंबेजोगाई, जि. बीड येथील आम्रपाली ...

State Level Teacher Icon Award to Ganesh Dharmale | गणेश धर्माळे यांना राज्यस्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्कार

गणेश धर्माळे यांना राज्यस्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्कार

पुसद : तालुक्यातील श्रीरामपूर येथील मातोश्री सुभद्राबाई जिल्हेवार विद्यालयाचे शिक्षक, ग्रामगीताचार्य गणेश धर्माळे यांना अंबेजोगाई, जि. बीड येथील आम्रपाली प्रकाशन संस्थेने राज्यस्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्कार प्रदान केला.

अंबेजोगाई येथील दिवंगत विलासराव देशमुख सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते. या पुरस्कारासाठी ५ हजार प्रस्ताव आले. त्यातून निवडक ३९ पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांची निवड करण्यात आली. केवळ १७ शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. अरुंधती पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संदीप त्रिभुवन, राजू नागरगोजे, सदाशिव बागडे, संगीता ढोले, जनाबाई आमदने, लखानजी काशीकर, डॉ. दत्तात्रेय नलावडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण साळुंके यांनी केले. गणेश धर्माळे यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले. त्यांचे संस्थाध्यक्ष विनोद जिल्हेवार, सचिव सुभाष कोसलगे, मुख्याध्यापक विवेक जोशी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

Web Title: State Level Teacher Icon Award to Ganesh Dharmale