पुसद येथे राज्यस्तरीय सोनार समाज संमेलन
By Admin | Updated: January 13, 2017 01:38 IST2017-01-13T01:38:39+5:302017-01-13T01:38:39+5:30
आॅल इंडिया सोनार फेडरेशनच्यावतीने कांचनदास भगवंत वाढोणकर स्मृती सोनार जोडे अभियानांतर्गत विदर्भस्तरीय

पुसद येथे राज्यस्तरीय सोनार समाज संमेलन
पुसद : आॅल इंडिया सोनार फेडरेशनच्यावतीने कांचनदास भगवंत वाढोणकर स्मृती सोनार जोडे अभियानांतर्गत विदर्भस्तरीय सोनार समाज महासंमेलनाचे आयोजन गुरुवार १९ जानेवारी रोजी येथील गणोबा मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
या महासंमेलनात विदर्भातील पाच हजारांवर सर्वशाखीय सोनार समाज बांधव सहभागी होणार आहे. प्रस्तावित महासंमेलनाचे तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार भावनाताई गवळी, राज्यमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार मनोहरराव नाईक, नगराध्यक्ष अनिताताई नाईक, फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर उपस्थित राहणार आहे. या संमेलनाच्या अधिक माहितीसाठी डॉ. देवेंद्र शेरेकर, दिलीप महतकर, नारायण शेरेकर, आशिष वाढोणकर, दिलीप शेरेकर, विलास अनासरे, सुभाष वेदपाठक, अविनाश बिंड, नंदकिशोर पडोळे, शैलेश दुरतकर, विनोद बिंद, मधुकर टोम्पे, नामदेव सुवर्णकार, पारस देवपूरकर, राजेश पंडित यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)