शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वणीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

By admin | Published: April 04, 2017 12:13 AM

नगरपरिषद वणीकडून रंगनाथ स्वामी यात्रा महोत्सवानिमित्त कृषी समृद्धी महोत्सव २०१७ अंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा....

वणी : नगरपरिषद वणीकडून रंगनाथ स्वामी यात्रा महोत्सवानिमित्त कृषी समृद्धी महोत्सव २०१७ अंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा ८ ते १३ एप्रिल या कालावधीत वणी येथील रंगनाथ स्वामी यात्रा मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. उद्घाटन ८ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांची उपस्थिती राहिल, तर १३ एप्रिल रोजी होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग उपस्थित राहतील. दरम्यान महाराष्ट्रातील ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ व अभ्यासकांचे कापूस, सोयाबिन, शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदे, पाणी व्यवस्थापन, अर्थ, नियोजन यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन लाभेल. शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल या ठिकाणी असतील. तसेच बँकांचेही स्टॉल असतील. यावेळी बँकेच्या प्रतिनिधींकडून त्या ठिकाणी कर्ज, प्रकल्प अहवाल, योजना, कागदपत्र आदींबाबतचे सखोल मार्गदर्शन मिळेल. १२ एप्रिल रोजी पशू प्रदर्शन राहिल. तसेच धान्य महोत्सव आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाची थेट विक्री या ठिकाणी होईल. जवळपास दीडशे स्टॉल आतार्यंत बुक झाल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शन व मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले. पत्रपरिषदेला आमदार प्रा. राजू तोडसाम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, नगरसेवक डॉ. महेंद्र लोढा उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)