शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये राज्यमार्गाला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

रस्ता तयार होतो न होतो तोच त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दिग्रस ते दारव्हा या राज्य महागामार्गचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरु करताना रस्ता संपूर्ण खोदून काढला. त्यामुळे दोन वर्षांपासून वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करताना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागला.

ठळक मुद्देनिकृष्ट साहित्य : दारव्हा मार्गाच्या चौकशीची मागणी

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : दिग्रस ते दारव्हा या राज्य महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. आता कुठे एकतर्फी रस्ता तयार झाला. मात्र रस्ता तयार होतो न होतो तोच त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.गेल्या दोन वर्षांपासून दिग्रस ते दारव्हा या राज्य महागामार्गचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरु करताना रस्ता संपूर्ण खोदून काढला. त्यामुळे दोन वर्षांपासून वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करताना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागला. पावसाळ्यादरम्यान रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक दुचाकी व मोठ्या वाहनांचे अपघात घडले. अनेक वाहनधारकांना दुखापत झाली. अशा अनेक घटनांनंतर कंत्राटदाराने रस्त्याचे एकतर्फी काम सुरु केले. सिमेंटचा रस्ता तयार केला. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आता स्पष्ट होत आहे.या सिमेंटच्या राज्य महामार्गाचे बांधकाम करताना कंत्राटदाराने मातीमिश्रीत रेती वापरली. निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले. तसेच सिमेंटचा वापरही कमी केला. त्यामुळे आता या सिमेंट रस्त्याला भेगा पडत आहे. पहिलेच अतिशय संथगतीने काम सुरू असलेल्या या रस्त्यामुळे प्रवाशांचे हात होत आहे. त्यात आता रस्त्याला भेगा पडल्या. त्यामुळे वाहनधारकच संकटात सापडले आहे. अनेक दुचाकी स्लिप होऊन अपघात घडत आहे. मात्र प्रवाशांच्या हिताचे कोणतेही काम या संबंधित कंत्राटदाराकडून होताना दिसत नाही.वाहनधारकांमध्ये प्रचंड रोषसिमेंट रस्ता तयार होताच त्याला भेगा पडल्याने वाहनधारकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. रस्ता तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने भेगा पडत असल्याचे लक्षात येत आहे. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्ता कामाची चौकशी करून रस्ता सुरळीत करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा