राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:03 PM2017-12-12T22:03:50+5:302017-12-12T22:04:46+5:30

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे मागणी दिन साजरा करण्यात आला. जिल्हा कचेरीसमोर धरणे देऊन निदर्शने करण्यात आली.

State Government employees' dams | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे धरणे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे धरणे

Next

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे मागणी दिन साजरा करण्यात आला. जिल्हा कचेरीसमोर धरणे देऊन निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी दुपारी २ ते ३ या वेळात धरणे दिले.
महागाई भत्त्याची रक्कम वेतनात समायोजित करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे त्वरीत भरावी, निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, कंत्राटी व नैमित्तीक कर्मचारी आणि परिचारिकांना शासकीय सेवेत कायम करावे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर मोक्का लावण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाचे लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तारखेपासूनच लागू करण्यात यावे, २८ नोव्हेंबर २०१५ रोजीचा संच मान्यतेसंबंधीचा निर्णय रद्द करावा आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले.
धरणे व निदर्शनामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश वैद्य, नंदकुमार बुटे, कार्याध्यक्ष आशीष जयसिंगपुरे, किशोर पोहनकर, श्रीरंग रेकलवार, विजय साबापुरे, नंदकुमार नेटके, प्रवीण इंगोले, प्रमोद पोहेकर, राजू आढाव, अविनाश जानकर, नरेंद्र राऊत, राजेंद्र गावंडे, नदीम पटेल, मिलिंद सोळंके, राजेश कडू, सुभाष वानरे, शरद निबुदे, गजानन टाके, महादेव गोल्हर, राजू मानकर, राजू तोडासे, सुनील गिरी, अतुल देशपांडे, अशोक कट्यारमल, श्याम मॅडमवार, गोपाल गायकवाड, संतोष हुडेकर, संजय गोरलेवार, प्रवीण इंगोले, विष्णू कुळकर्णी, कल्पेश वाडिवा, गोपाल शेलोकार, रवी चव्हाण, अतुल शिंगारे, प्रवीण नाईकवाड, स्वप्नील पानोडे, योगेश खरात, संतोष देवतळे, धीरज डाखरे, मिलिंद बोरकर, रवींद्र चव्हाण, आनंद कांबळे, आनंद भगत, अविनाश वाकोडे, मंगेश सुळके, नितीन पटकुलवार, सचिन बागडे, रत्नाकर मुळे, प्रवीण शिंदे, नरेंद्र उके, सचिन परचाके, राजू उईके आदी सहभागी झाले होते.

Web Title: State Government employees' dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.