शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खडकूही नाही; वणीतील सभेत आघाडी सरकारवर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 20:13 IST

Yawatmal News शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देवणी नगरपालिकेने तयार केलेले उद्यान अतिशय देखणे असून दिव्यांग व्यक्ती या उद्यानात विहार करू शकतो, अशी व्यवस्था या ठिकाणी असल्याचे सांगत, त्यांनी वणी नगरपालिकेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे तथा सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

 यवतमाळ : सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापसाची बोंडे काळी पडली. सोयाबीनच्या शेंगात दाणे नाहीत. अशा परिस्थितीत आघाडी सरकार केवळ घोषणाबाजीत दंग आहे. प्रत्यक्षात या सरकारने एक खडकूही दिला नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. (Devendra Fadanavis )

नगरपालिकेच्या वतीने वणी शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर होते. व्यासपीठावर माजी मंत्री तथा आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, माजी नगरविकास राज्यमंत्री आमदार डॉ. रणजित पाटील, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, वणीचे नगराध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, भाजप नेते दिनकर पावडे, जि.प. सदस्या मंगला पावडे, विजय चोरडिया, विजय पिदुरकर, रवी बेलूरकर आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी येथे दाखल होताच निळापूर शेतशिवारातील शेतकरी कृष्णराव गोविंद झट्टे यांच्या शेतात भेट देऊन पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नवनिर्मित छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पार पडलेल्या सभेत त्यांनी राज्य शासनाच्या धोरणावर टीकास्त्र सोडले. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस