वणी येथे बेलदार समाजाची राज्यस्तरीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:34 IST2018-02-23T23:34:56+5:302018-02-23T23:34:56+5:30

वणी येथे बेलदार समाजाची राज्यस्तरीय परिषद
ठळक मुद्देसुशगंगा पॉलीटेक्नीकमध्ये बेलदार समाजाची राज्यस्तरीय गोलमेज परिषद पार पडली.
ऑनलाईन लोकमत
वणी : येथील सुशगंगा पॉलीटेक्नीकमध्ये बेलदार समाजाची राज्यस्तरीय गोलमेज परिषद पार पडली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिनानाथ वाघमारे, सुशगंगाचे संचालक प्रदीप बोनगीरवार, बेलदार समाज संस्थेचे अध्यक्ष बाजीराव बुग्गेवार उपस्थित होते. संचालन प्रमोद कालबांडे, प्रास्ताविक मुकुंद अडेवार व गजानन चंदावार यांनी केले, तर आभार राकेश बरशेट्टीवार यांनी मानले. नियोजन उमाकांत जामलीवार यांनी केले.