पांढरकवडा उपविभाग सुरू; ; कर्मचार्यांची वानवा
By Admin | Updated: May 25, 2014 00:47 IST2014-05-23T20:40:03+5:302014-05-25T00:47:37+5:30
अकोला जंगलांचे संवर्धन व्हावे व वनवृद्धी व्हावी, याकरिता वन विभागाच्यावतीने पांढरकवडा उपविभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र, या विभागासाठी नवीन पदे निर्माण केली नसून, अकोला व नागपूर वनविभागातील कर्मचार्यांची येथे बदली करण्यात आली आहे.

पांढरकवडा उपविभाग सुरू; ; कर्मचार्यांची वानवा
अकोला : जंगलांचे संवर्धन व्हावे व वनवृद्धी व्हावी, याकरिता वन विभागाच्यावतीने पांढरकवडा उपविभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र, या विभागासाठी नवीन पदे निर्माण केली नसून, अकोला व नागपूर वनविभागातील कर्मचार्यांची येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच कमी कर्मचारी असलेल्या अकोला व नागपूर येथील कार्यालयात कर्मचार्यांची उणीव भासत आहे.
अकोला व नागपूर विभागाचे विभाजन करून नवीन पांढरकवडा उपविभाग वन विभागाच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. नागपूर विभागातील टिपेश्वर आणि अकोला विभागातील पैनगंगा ही दोन अभयारण्ये पांढरकवडा उपविभागाशी जोडण्यात आली आहेत. यासोबतच नागपूर व अकोला येथील कार्यालयातील कर्मचार्यांचीही बदली पांढरकवडा येथे करण्यात आली आहे. अकोला येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयातील मुख्य लिपिक १, स्टेनो १, चालक १, अकाऊंटंट १, लिपिक २ अशा सहा कर्मचार्यांची बदली पांढरकवडा येथे करण्यात आली आहे. अकोला कार्यालयातील सहा कर्मचार्यांची बदली करण्यात आल्यामुळे या कार्यालयात कर्मचार्यांची कमतरता भासत आहे. सध्या अकोला वन्यजीव विभागाकडे काटेपूर्णा व ज्ञानगंगा हे दोन अभयारण्य आहेत. या अभयारण्याच्या संवर्धन व विकासाची कामे अकोला कार्यालयातून चालतात. सध्या कर्मचारी कमी असल्यामुळे एकाच कर्मचार्याला अनेक कामे करावी लागत आहेत. त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.