रमाबाई आंबेडकर वाचनालय सुरू करा
By Admin | Updated: June 26, 2016 02:31 IST2016-06-26T02:31:00+5:302016-06-26T02:31:00+5:30
स्थानिक पाटीपुरा परिसरात असलेल्या नगरपरिषद शाळा क्रमांक ५ मध्ये रमाबाई आंबेडकर वाचनालय सुरू करण्यात यावे,

रमाबाई आंबेडकर वाचनालय सुरू करा
नगरपरिषदेला निवेदन : बहुजन, शोषित, समाज संघर्ष समितीची मागणी
यवतमाळ : स्थानिक पाटीपुरा परिसरात असलेल्या नगरपरिषद शाळा क्रमांक ५ मध्ये रमाबाई आंबेडकर वाचनालय सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी बहुजन, शोषित, समाज संघर्ष समितीच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
गत दोन ते तीन वर्षांपासून वाचनालयासाठी इमारत उभारलेली असतानाही नगरपरिषदेने हेतुपूरस्सर डोळेझाक केली. यामुळे विद्यार्थ्यांना वाचनासाठी बाहेर जावे लागते. लागणारी पुस्तक आणि बसण्याची व्यवस्था निर्माण करावी. यामुळे एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
यामुळे हे वाचनालय तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांना सादर करण्यात आले. उमेश मेश्राम, सतीश जीवने, सुमेध वासनिक, कार्तिक दांडेकर, गुदपाल देशभ्रातार, प्रफुल्ल अडकने आदी उपस्थित होते.
(शहर वार्ताहर)