निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ

By Admin | Updated: November 12, 2016 01:49 IST2016-11-12T01:49:37+5:302016-11-12T01:49:37+5:30

नगरपरिषद निवडणुकीच्या शुक्रवारी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुसदमध्ये ४४,

Start of election rally | निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ

निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ

नगरपरिषद : पुसद ४४, दिग्रस १८ आणि उमरखेडमध्ये १६ उमेदवारांची माघार
पुसद/दिग्रस/उमरखेड : नगरपरिषद निवडणुकीच्या शुक्रवारी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुसदमध्ये ४४, दिग्रसमध्ये १८ आणि उमरखेडमध्ये १६ जणांनी नगरसेवकाच्या रिंगणातून माघार घेतली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी या तीनही नगरपरिषदांमध्ये २१ जण रिंगणात आहे. पुसदमध्ये नगराध्यक्ष पदाची तिरंगी लढत होत असून उमरखेडमध्ये आठ आणि दिग्रसमध्ये १० उमेदवार रिंगणात आहेत.
पुसदमध्ये ११७ उमेदवार
पुसद नगरपरिषदेच्या २९ नगरसेवकांसाठी १६१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत ४४ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता १४ प्रभागात ११७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत २१ जणांनी उमेदवारी मागे घेतली होती. आज नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २४ जणांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे उमेदवारी मागे घेणाऱ्यांची संख्या ४४ झाली आहे.
दिग्रसमध्ये ९८ उमेदवार
दिग्रस नगरपरिषदेच्या २४ नगरसेवकांच्या जागांसाठी ११६ नामांकन दाखल झाले होते. त्यापैकी १६ जणांनी नामांकन मागे घेतल्याने ९८ उमेदवार कायम राहिले आहेत. माघार घेणाऱ्यांमध्ये प्रभाग क्र. १ अश्विन चौधरी, राहुल राठोड, प्रभाग १ किरण लाखेवार, प्रभाग ४ माणिक मुनेश्वर, प्रभाग ५ अ.खालीक म.अयुब शेख, प्रभाग ६ एजाज अ.हक, अ.हक बशीर, प्रभाग ७ दीपा देवघरे, प्रभाग ८ फजल खान गुलाब खान, प्रभाग ९ तुकडी बेगम शे.करीम नागपुरे, अमिनाबी मुबारक अली मलनस, प्रभाग ९ किशोर मारोती कदम, प्रभाग क्र. ११ शे.करीम शे.हसन नागपुरे, सलीम जुम्मा दादूवाले, नासीर अहमद शे.बंदू, प्रभाग ११ जैतूनबी शे.मुसा नागपुरे, करिश्मा इरफान नवरंगाबादे, रेहनाबानो नासीर यांचा समावेश आहे. आता निवडणुकीच्या खऱ्या प्रचाराला प्रारंंभ होणार असून २७ नोव्हेंबरपर्यंत रणधुमाळी कायम राहणार आहे.
उमरखेडमध्ये उमेदवारांची शंभरी
उमरखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या २४ जागांसाठी ११६ नामांकन दाखल झाले होते. त्यापैकी अखेरच्या दिवसापर्यंत १६ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता उमरखेड नगरपरिषदेच्या रिंगणात १०० उमेदवार भाग्य आजमावित आहे.
नगराध्यक्ष पदासाठी उमरखेडमध्ये दहा उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी दोन जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे भारत खंदारे, भाजपाचे नामदेव ससाने, शिवसेनेचे पुरुषोत्तम काळे, प्रहारचे राजू गायकवाड, एमआयएमचे अ‍ॅड. शंकर मुनेश्वर, बसपाचे संजय खंदारे यांच्यासह दोन अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. उमरखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली ंआहे. एमआयएमने नगराध्यक्षासह १२ नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात ठेवले आहे. त्याचा फटका नेमका कुणाला बसणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे. सध्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. (लोकमत चमू)

Web Title: Start of election rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.