शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

‘त्या’ युवकाला घातक शस्त्रे बाळगण्याचा छंद

By admin | Updated: August 13, 2016 01:24 IST

प्रत्येकाला कशाचा ना कशाचा छंद असतो. आपल्या आवडीच्या वस्तू गोळा करण्यासाठी अनेक जण आपले आयुष्य खर्ची घालतात.

अमृतसरच्या पार्सलने भंडाफोड : पोलिसांच्या घरझडतीत आणखी शस्त्रे जप्त यवतमाळ : प्रत्येकाला कशाचा ना कशाचा छंद असतो. आपल्या आवडीच्या वस्तू गोळा करण्यासाठी अनेक जण आपले आयुष्य खर्ची घालतात. छंद जोपासणे हा वैयक्तिक विषय होय. मात्र अमृतसरवरुन पोस्टाने आलेल्या एका पार्सलने यवतमाळातील एका तरुणाचा घातक शस्त्रे गोळा करण्याच्या छंदाचा भंडाफोड झाला. त्याच्या घरझडतीत मोठा शस्त्रसाठाही आढळून आला. अमृतसर येथून पोस्टाच्या कुरिअरने तलवारी यवतमाळात चार तलवारी बोलविण्यात आल्याचे ‘लोकमत’ वृत्त ‘लोकमत’ आॅनलाईनवर झळकताच, त्याची दखल घेऊन टोळी विरोधी पथकाने घेत येथील आनंदनगरातील अमोल रामानंद पांडे (३०) याच्या घराची झडती घेतली. यवतमाळाच्या मध्यवर्ती डाक कार्यालयात अमृतसरवरून एक पार्सल आले. हाताळणीत या पार्सलचे पॅकींग फाटल्याने त्यात तलवारी असल्याचे आढळून आले. सदर बाब मागील आठ दिवसांपूर्वीच डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. यावर वरिष्ठांनी कोणतीच कारवाई केली नाही. अखेर ‘लोकमत’मध्ये या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले. पोस्टाकडून कोणती ही कारवाई होण्यापूर्वीच टोळी विरोधी पथकाने शुक्रवारी सकाळी सदर युवकाचे घर गाठून झडती घेतली. यामध्ये त्या युवकाच्या घरात एक धारदार तलवार, फरशी कुऱ्हाड आणि तीन गुप्ती असा घातक शस्त्र साठा आढळून आला. अमोल पांडे या युवकाची गुन्हेगारी पार्श्वभुमी आहे काय, याचाही शोध टोळी विरोधी पथक घेत आहे. अमोल विरोधात शस्त्रात्र प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केला. शहरात मागील काही दिवसापासून सातत्याने खुनाचे सत्र सुरू आहे. गुन्हेगारी टोळक्यामध्ये आपसातील वादातून बहुतांश खुन झाल्याचे पुढे आले आहे. यामध्ये वापरण्यात येणारी धारदार शस्त्र आणि अमोल पांडे याचे काही कनेक्शन लागते काय, याचाही पोलीस तपास करणार आहे. मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा बोलावून येत्या काही दिवसात मोठा घातपात घडविण्याचा कट तर नाही ना, यावरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अमोल पांडे याने पॉलिटेक्निकचा डिल्पोमा केला आहे. सध्या तो आर्णी मार्गावर असलेल्या एका वाईन शॉपमध्ये नोकरी करत असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. त्याने अृमतसर येथील हॅन्डीक्राफ कंपनीकडून या चार तलवारींची आॅर्डर केल्या. त्याच कंपनीने अमोलच्या पत्यावर हा शस्त्रसाठा कुरिअरच्या माध्यमातून पाठविण्याची व्यवस्था केली. (कार्यालय प्रतिनिधी)