‘एसटी’ कार्यशाळेतील कर्मचारी असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:18+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची बिनकामाची गर्दी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत एसटी बसफेऱ्या बंद ठेवल्या जाणार आहे. या काळात बस दुरुस्तीची कामे निघणारी नाही. तरीही कर्मचाºयांची कार्यशाळेत गर्दी वाढविण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे संदेश आहे. विभागीय कार्यशाळेत मात्र याचे पालन होत नसल्याचे दिसून येते.

‘एसटी’ कार्यशाळेतील कर्मचारी असुरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची बिनकामाची गर्दी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत एसटी बसफेऱ्या बंद ठेवल्या जाणार आहे. या काळात बस दुरुस्तीची कामे निघणारी नाही. तरीही कर्मचाºयांची कार्यशाळेत गर्दी वाढविण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे संदेश आहे. विभागीय कार्यशाळेत मात्र याचे पालन होत नसल्याचे दिसून येते.
या कार्यशाळेतील कर्मचाºयांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी ३१ मार्चपर्यंत कार्यशाळा आणि विभागीय भांडार बंद ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. या काळात अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
विभागीय कार्यशाळा व भांडारात १०५ कर्मचारी एकत्रित कामे करत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कोणतीही दक्षता याठिकाणी घेतली जात नाही. सुविधाही उपलब्ध होत नाही. शासकीय निर्गमित परिपत्रकांचीही दखल घेतली जात नाही. नागपूर, औरंगाबाद मध्यवर्ती कार्यशाळा एवढेच नव्हे तर वर्धा येथील कार्यशाळा बंद करण्यात आली आहे. याशिवाय कामगारांची गर्दी होणारे खासगी उद्योगही यवतमाळात बंद आहेत.
सोमवारी ९० टक्के कर्मचारी कामगिरीवर आहे. कोरोनाची प्रचंड दहशत असताना कर्मचाºयांना कामावर बोलाविण्याचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. यावर तोडगा काढावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
विभागीय कार्यशाळा व भांडार विभागातील पी.बी. बोनगीनवार, एस.एन. झोपाटे, व्ही.एम. मिश्रा, आर.व्ही. बिडवे, जे.यू. मिर्झा, एम.एन. शेंडे, ओ.डी. दमकोंडवार, पंजाब ताटेवार, सुनील वानखेडे, सुदाम वनकर, राजेंद्र भांडवलकर आदींनी आपल्या स्वाक्षºयानिशी निवेदन दिले.
कार्यशाळेत फुरसतीची कामे
विभागीय कार्यशाळेत अपघातामुळे निघालेली बसची कामे, आरटीओ पासिंग, रिकंडिशन वर्क चालते. विभागीय भांडारातून आगाराला साहित्याचा पुरवठा केला जातो. इतर दैनंदिन कामे होत नाही. ही कामे आगार पातळीवर होतात. तरीही कर्मचाºयांना कामावर बोलाविले जात आहे.