प्रलंबित प्रश्नांसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:15 IST2019-07-26T23:15:18+5:302019-07-26T23:15:54+5:30

प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी येथील तिरंगा चौकात निदर्शने केली. टप्प्याटप्प्याने करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. ३० जुलैला काळ्याफिती लावून काम केले जाणार आहे.

Staff demonstrations for pending questions | प्रलंबित प्रश्नांसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने

प्रलंबित प्रश्नांसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी येथील तिरंगा चौकात निदर्शने केली. टप्प्याटप्प्याने करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. ३० जुलैला काळ्याफिती लावून काम केले जाणार आहे.
नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाºयांचा दर्जा देण्यात आला. ग्रेड पे मात्र वर्ग-३ चा दिला. हा ग्रेड पे ४३०० वरून ४६०० करावा, महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करावे, अव्वल कारकूना संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करावी, नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी, महसूलेतर कामांसाठी स्वतंत्र कर्मचारीवृंद निर्माण करावा, लोकसेवा आयोगातील महसूल विभागातील पदे भरताना महसूल सेवेतील कर्मचाºयांसाठी ५ टक्के पदे गृहविभागाच्या धर्तीवर राखून ठेवावी, रिक्त पदे त्वरीत भरावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. ,
या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन टाके, सरचिटणीस नंदकुमार बुटे यांच्यासह आशिष जयसिंगपुरे, गोपाल गायकवाड, श्याम मॅडमवार, अतुल देशपांडे, संजय भास्करवार, दिलीप कडासने, अजय भाविक, विनोद उन्हाळे, सतीश कांबळे, नितेश वाढई, विलास जाधव, मनोज राठोड, संदीप गायकवाड, दत्ता निंबाळकर, दीपक पराते, भीमराव भगत, यामिनी कोरे, सुषमा टिचकुले, सुरेखा मंगाम, बागडे, येरणे, कांचन देडे, पूजा जामनिक, शिरभाते, श्रद्धा कुडमेथे, योगिता कातिले, ज्योती गोर्लेवार, मनीषा चव्हाण, शंकरराव मडावी, प्रवीण शिंदे, राजू उईके आदी सहभागी झाले होते.

Web Title: Staff demonstrations for pending questions

टॅग्स :Strikeसंप