एसटी कार्यशाळा कर्मचाऱ्यांना सुट्यांसाठी आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:40+5:30

कामाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी शासनाने कर्मचाºयांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणली आहे. एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागातील विभागीय आणि आगारातील कार्यशाळेने मात्र आळीपाळीने ५० टक्के कर्मचारी बोलाविणे सुरू केले आहे. याठिकाणी कर्मचाऱ्याची वाढती गर्दी कोरोना संसर्गाला पूरक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ST workshop staff waiting for leave to order | एसटी कार्यशाळा कर्मचाऱ्यांना सुट्यांसाठी आदेशाची प्रतीक्षा

एसटी कार्यशाळा कर्मचाऱ्यांना सुट्यांसाठी आदेशाची प्रतीक्षा

ठळक मुद्देडीसींना निवेदन : ५० टक्के कामगारांवर काम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालयातील गर्दी कमी केली जात असताना एसटी महामंडळाचा यवतमाळ विभाग मात्र ५० टक्केवर थांबला आहे. विभागीय आणि आगारातील कार्यशाळेतील पूर्ण कर्मचाऱ्यांना सुटी देण्याविषयी मध्यवर्ती कार्यालयाकडून आदेशाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मंगळवारी दुसऱ्या दिवशी एसटी कामगार संघटनेने सुटी संदर्भात विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केले.
कामाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी शासनाने कर्मचाºयांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणली आहे. एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागातील विभागीय आणि आगारातील कार्यशाळेने मात्र आळीपाळीने ५० टक्के कर्मचारी बोलाविणे सुरू केले आहे. याठिकाणी कर्मचाऱ्याची वाढती गर्दी कोरोना संसर्गाला पूरक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय कलम १४४ चा भंग होत असल्याचे कामगार संघटनेने विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न मानणारे आदेश प्रशासनाकडून काढणे अमानवीयतेचे दर्शन घडविणारे आहे, असा आरोप करण्यात आला आहे. राज्यातील इतर विभागात एसटीच्या कार्यशाळा बंद ठेवण्यात येत आहे. यवतमाळ विभागासाठी वेगळा न्याय का, असा प्रश्न विचारला जात आहे. कोरोना संक्रमणाचा धोका पाहता ३१ मार्च किंवा शासनाच्या पुढील आदेशापर्यंत कार्यशाळा बंद ठेवण्यात यावी, असे संघटनेचे यवतमाळ विभागीय सचिव राहुल धार्मिक यांनी म्हटले आहे.

कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना सुटीविषयी मध्यवर्ती कार्यालयाला कळविण्यात आले आहे. त्यांचा आदेश झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
- श्रीनिवास जोशी,
विभाग नियंत्रक, यवतमाळ

Web Title: ST workshop staff waiting for leave to order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.