‘एसटी’च्या महिला वाहकांना नऊही महिन्यांची पगारी रजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 16:50 IST2017-08-29T16:50:01+5:302017-08-29T16:50:31+5:30
कामाचा वाढता ताण, खडतर रस्त्यावरून दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) महिला वाहकांच्या गर्भपाताचे प्रमाण वाढल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. महिला वाहकांचे मातृत्व हिरावले जाऊ नये, या भावनेतून त्यांच्या प्रसूती रजेमध्ये तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता पूर्ण नऊ महिने पगारी रजा उपभोगता येणार आहे.

‘एसटी’च्या महिला वाहकांना नऊही महिन्यांची पगारी रजा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कामाचा वाढता ताण, खडतर रस्त्यावरून दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) महिला वाहकांच्या गर्भपाताचे प्रमाण वाढल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. महिला वाहकांचे मातृत्व हिरावले जाऊ नये, या भावनेतून त्यांच्या प्रसूती रजेमध्ये तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता पूर्ण नऊ महिने पगारी रजा उपभोगता येणार आहे.
महिला वाहकांना सहा महिने प्रसूती रजा दिली जात होती. गरज भासल्यास अतिरिक्त सुटी घ्यावी लागत होती. मात्र या सुटीचे वेतन मिळत नव्हते. बिनपगारी झाल्याने निर्माण होणाºया आर्थिक प्रश्नांच्या भितीतून त्यांना कामावर जावे लागत होते. चाळण झालेल्या रस्त्यावरून धक्के खात होणारा प्रवास, दगदग यामुळे काही महिला वाहकांचा तर दोन वेळा गर्भपात झालेला आहे. हा प्रश्न गंभीर होत चालल्याने गर्भवती महिला कामगारांना काही महिन्यांपूर्वी ‘टेबल वर्क’ देण्यात आले होते. प्रसूती काळात दिल्या जाणाºया रजा वाढविण्यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या चार सदस्यिय समितीने दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय महामंडळाने घेतला होता. आता सुटीचा कालावधी नऊ महिने करण्यात आला आहे.
सहा महिने मिळणारी रजा कधी घ्यायची याचा निर्णय महिला कामगारांचा असतो. बहुतांश महिला जन्मानंतर बाळाच्या संगोपनासाठी या रजेचा वापर करतात. काही बाबतीत वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्यानुसार प्रसूतिपूर्व संपूर्ण विश्रांतीची गरज निर्माण झाल्यास अतिरिक्त रजा घेतली जाते. महामंडळात अतिरिक्त रजेचे वेतन मिळत नाही. हीच बाब त्यांच्या गर्भपाताला कारणीभूत ठरत असल्याने तीन महिने पगारी रजा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. भविष्यात ज्या महिला कामगारांना अशा रजेची आवश्यकता भासेल त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
मातृत्वाचा योग्य सन्मान
परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेत झालेल्या एसटी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठकीत तीन महिने अतिरिक्त पगारी रजेचा निर्णय घेण्यात आला. स्त्रीचे मातृत्व हे तिच्यासाठी मांगल्याची घटना आहे. तिच्या मातृत्वाचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे, तिचे मातृत्व कोणत्याही स्वरूपात हिरावून घेतले जाता कामा नये या भावनेतून एसटीच्या महिला कर्मचाºयांसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ‘एसटी’ने म्हटले आहे.