शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ST Employees: 500 रुपयात दोन ड्रेस कसे शिवणार? हा शिलाई भत्ता की एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 08:08 IST

ST Employees: पाच वर्षांपूर्वी शिवून मिळालेल्या गणवेशाविषयी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रचंड ओरड झाल्यानंतर आता गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे.

यवतमाळ : पाच वर्षांपूर्वी शिवून मिळालेल्या गणवेशाविषयी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रचंड ओरड झाल्यानंतर आता गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. बाजारात दोन गणवेशाच्या शिलाईसाठी कमीत कमी १२०० ते १६०० रुपये  खर्च येतो. मात्र महामंडळाने केवळ २५० रुपये प्रतिगणवेष म्हणजे ५०० रुपये शिलाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘भत्ता देता की थट्टा करता’ असा संताप कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

पूर्वी कर्मचाऱ्यांना कापड आणि शिलाई भत्ताच दिला जात होता. मात्र, २०१७ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री व एसटी महामंडळ अध्यक्षांनी गणवेश बदलण्याची योजना आखून दोन तयार गणवेश दिले होते. या गणवेशाबाबत प्रचंड तक्रारी आल्याने महामंडळाने कापड, शिलाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला. 

६५ हजार कर्मचारी, १५ कोटी खर्च सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात ६५ हजार कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी कापड आणि शिलाई भत्ता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एकूण खर्च १५ कोटी रुपये आहे. 

खर्च १६००, मिळणार ५००एसटी कर्मचाऱ्यांच्या मते एका दोन ड्रेससाठी कमीत कमी १६०० रुपये शिलाई खर्च येतो. मात्र भत्ता ५०० रुपये मिळणार असल्याने एकाला ११०० रुपये खिशातून भरावे लागणार आहे. ६५ हजार कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास ७ कोटींहून अधिक रुपये शिलाईपोटी खिशातून भरावे लागणार आहेत. 

टॅग्स :state transportएसटीYavatmalयवतमाळ