शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

एसटीचालकांच्या समुपदेशन योजनेला तडा

By विलास गावंडे | Updated: May 14, 2025 21:09 IST

जोखमीचे काम करत असलेले एसटी चालक तणावमुक्त राहावे, या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या समुपदेशन योजनेला तडा गेला आहे.

विलास गवांडे, यवतमाळ: जोखमीचे काम करत असलेले एसटी चालक तणावमुक्त राहावे, या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या समुपदेशन योजनेला तडा गेला आहे. महामंडळाच्या आर्थिक काटकसरीच्या धोरणामुळे हा उद्देश असफल झाल्याचे सांगितले जाते. आज केवळ २० समुपदेशकांच्या भरवशावर ही योजना सुरू आहे. महामंडळात ३४ हजार चालक कार्यरत आहेत.

डिसेंबर १९१७ मध्ये चालक पदातील कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशक नेमण्याची संकल्पना अमलात आणली गेली. तीन ते चार आगारांसाठी एक या प्रमाणात एकूण ६३ समुदेशक मानद तत्त्वावर घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. समुपदेशकांसाठी दरमहा रुपये चार हजार इतके मानधन, एमएसडब्लू शैक्षणिक अर्हता आणि किमान तीन वर्षांचा अनुभव, अशा अटी निश्चित करण्यात आल्या होत्या.

उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार इतक्या कमी मानधनावर काम करायला तयार नाहीत. परिणामी अपेक्षित उमेदवार मिळाले नाही. जे मिळाले त्यातील काहींनी काम सोडून दिले. महामंडळात काम करणाऱ्या चालकांची मनस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच समुपदेशनाची संकल्पना अमलात आणण्यात आली होती. या योजनेचा बोजवारा उडाला आहे.

सुविधांची बोंब, चालकांना त्रासचालकांकरिता योग्य विश्रांतिगृह नाही. अस्वच्छता असल्याने बहुतेक सर्व ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. काही आगारात पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मिळत नाही. कामगिरी लावण्यात पक्षपातीपणा केला जातो. गरजेच्या वेळी रजा देण्यात येत नाहीत. या व इतर बाबींचा परिणाम त्यांच्यावर होत आहे. एसटीकडे सद्या एमएसडब्यू शैक्षणिक अर्हताप्राप्त कामगार अधिकारी आहे. मात्र, कामगार शाखेकडे पुरेसे संख्याबळ नाही. चालकांच्या हातून गंभीर घटना टाळायच्या असतील तर त्यांना आवश्यक सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस काय म्हणाले?"एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार अधिकाऱ्यांना विशेष दर्जा आणि अधिकार दिले पाहिजेत. तसे झाल्यास आता ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्याला चाप लागेल. सध्याची रचना पाहिली तर कामगार अधिकारी निव्वळ टपालाचे काम करीत आहेत. हे चित्र बदलण्याची गरज आहे", असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रYavatmalयवतमाळ