एसटी चालक मोबाईलवर प्रवाशांचा जीव धोक्यात

By Admin | Updated: February 2, 2015 23:14 IST2015-02-02T23:14:48+5:302015-02-02T23:14:48+5:30

चालत्या वाहनांमध्ये चालक भ्रमणध्वनीवर बोलत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे अपघाताचीही शक्यता वाढली आहे़

ST driver threatens the life of passengers on mobile | एसटी चालक मोबाईलवर प्रवाशांचा जीव धोक्यात

एसटी चालक मोबाईलवर प्रवाशांचा जीव धोक्यात

वणी : चालत्या वाहनांमध्ये चालक भ्रमणध्वनीवर बोलत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे अपघाताचीही शक्यता वाढली आहे़
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस चालक व वाहकांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे. इतरही वाहनधारकांना वाहन चालविताना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मात्र या बंदीचा सर्वत्र फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे़ सध्या प्रत्येकाकडे मोबाईल आला आहे. त्यात बस चालक आणि वाहकही सीमील आहेत. मोबाईल ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांजवळ मोबाईल दिसतो. मात्र बस चालक अथवा इतर वाहनधारकांना हा मोबाईल काळ ठरू शकतो. सोबतच वाहनांतील प्रवाशांच्या जीवालाही धोका पोहोचू शकतो.
वाहन चालविताना एखाद्याचा भ्रमणध्वनी आला, तर चालक एका हातात स्टेअरिंग व दुसऱ्या हातात मोबाईल धरून वाहन चालविताना सर्रास दिसतात. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याचबरोबर चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास अपघाताचीही शक्यता बळाली आहे. शासनाने बस चालक व वाहकांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली. मात्र चालक व वाहक मोबाईलवर संपर्क साधताना सर्व प्रवाशांना दिसतात.
याबाबत एसटीच्या एका वाहकाला विचारणा केली असता, जर बस तपासणी पथक संबंधित मार्गावर आले, तर दुसरा बस चालक आम्हाला कळवितो़ त्यासाठी आम्ही मोबाईलचा वापर करतो, असे सांगण्यात आले. यावरून काही वाहक प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना तिकीट देत नसावे, अशी शंका व्यक्त होत आहे. या बाबीची खातरजमा करण्याची गरज आहे. त्यातून खरा प्रकार उघड होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सुरक्षित प्रवासासाठी बहुतांश प्रवासी बसने प्रवास करतात. मात्र बस चालक खुलेआम वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असल्याने प्रवासी धास्तीत सापडले आहे. त्यांच्या मोबाईलवरील बोलण्यामुळे यापुढे बसने प्रवास करावा की नाही, असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा ठाकला आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: ST driver threatens the life of passengers on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.