बसस्थानक चौकात एसटी चालकाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:58 IST2019-03-25T21:57:58+5:302019-03-25T21:58:13+5:30
येथील बसस्थानक चौकात कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले. ही घटना रविवारी रात्री १० वाजता घडली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

बसस्थानक चौकात एसटी चालकाला चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील बसस्थानक चौकात कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले. ही घटना रविवारी रात्री १० वाजता घडली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
देवानंद जयप्रकाश पवार (४०) रा. कमला पार्क असे मृताचे नाव आहे. पवार हे एसटी महामंडळाच्या राळेगाव आगारात चालक म्हणून कार्यरत होते. दुचाकीने घरी जाताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने (क्र.आरजे १४-जीई २६१५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीला काही अंतर फरपटत नेले.
ही घटना बघून बसस्थानक चौकातील नागरिक मदतीसाठी धावले. वनिता देशमुख यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. शहरातून रात्री जड वाहतुकीला परवानगी देण्यात आल्याने हे प्रकार घडत आहेत.