शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाला ३३०० कोटींची देणी त्यामुळे कर्मचाऱ्यांना संप, आंदोलने न करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:50 IST

एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन : उत्पन्न वाढविण्यासाठी साद

विलास गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मागील काही वर्षापासून उत्पन्नाचा आलेख कमालीचा घसरला आहे. कर्मचाऱ्यांची तीन हजार ३०० कोटी रुपयांची देयके रखडली आहेत. अशा परिस्थितीत मोर्चे, आंदोलने, संप करू नका, असे आवाहन महामंडळाने केले आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य करा, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

पगारातून कपात करण्यात आलेली भविष्यनिर्वाह निधी, उपदान, बैंक कर्ज आदी प्रकारची रक्कम महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. प्रत्येक महिन्याला थकबाकी वाढत जाऊन तीन हजार ३०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सरकारकडूनही विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीची रक्कम पूर्ण दिली जात नाही. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशा परिस्थितीत महामंडळाची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे.

पीएफची रक्कम मिळत नाहीकर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केलेली नाही. परिणामी ही रक्कम जमा होणारे ट्रस्टही अडचणीत आले आहे. अडचणीच्या काळात कर्मचारी या खात्यातून रक्कम काढतात. ट्रस्टकडेही आर्थिक टंचाई असल्याने कर्मचाऱ्यांना रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

९९३ मागितले मिळाले ३५० कोटीसवलतीच्या प्रतिपूर्तीचे सरकारकडे ९९३ कोटी ७६ लाख रुपये थकीत झाले आहे. महामंडळ अडचणीत असल्याने ही पूर्ण रक्कम देण्यात यावी, अशी विनंती सरकारला करण्यात आली. प्रत्यक्षात ३५० कोटी रुपये देऊन बोळवण करण्यात आली.

३८० कोटी दरमहा सवलत मूल्याचेविविध सवलतीच्या प्रतिपूर्तीचे दरमहा ३८० कोटी रुपये महामंडळाला सरकारकडून घेणे लागते. परंतु मागील काही महिन्यांपासून ३०० कोटी रुपये चुकता केले जाते. या रकमेतून कर्मचाऱ्यांचा पगारही होत नाही. अशावेळी महामंडळाला रोख स्वरूपात आलेल्या उत्पन्नातून पगाराच्या रकमेची तूट भरून काढली जाते. मागील दोन महिन्यांपासून मात्र ३५० कोटी रुपये देण्याचे सौजन्य दाखविले जात आहे.

"एसटीचा निधी मागणीच्या पत्राला सरकारकडून केराची टोपली दाखविली जात आहे. परिवहनमंत्र्यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष घालून तोडगा काढला पाहिजे."- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :ST Strikeएसटी संपYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र