शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

‘एसटी’ चालतेय प्रभारीच्या चाकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:59 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार प्रभारावर सुरू आहे. अधिकारी ते कर्मचारी या साखळीतील सर्व पदांची जबाबदारी प्रभारी असल्याने विभागात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिणामी महामंडळाला आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसमस्यांचा डोंगर : अधिकारी ते कामगारांची वानवा, तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार प्रभारावर सुरू आहे. अधिकारी ते कर्मचारी या साखळीतील सर्व पदांची जबाबदारी प्रभारी असल्याने विभागात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिणामी महामंडळाला आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे.मागील काही महिन्यांपासून विभाग नियंत्रक प्रभारी आहे. विभागीय वाहतूक अधिकारी, वणी येथे नियमित आगार व्यवस्थापक नाही, यवतमाळ बसस्थानकाला प्रमुखही प्रभारीच आहे. वाहतूक निरीक्षकही कायम स्वरूपी नाही. याशिवाय मुख्य कारागिरांची वाणवा आहे. शिकाऊ उमेदवारांकडून कार्यशाळेचा कारभार ढकलला जात आहे.नियमित अधिकारी नसल्याने कामांमध्ये सातत्य नसल्याचे दिसून येते. केवळ दिवस ढकलण्याचे काम सुरू आहे. जबाबदारीने काम सांभाळले जात नाही. परिणामी बसफेºया रद्द होणे, बसेसची वेळेत दुरुस्ती न होणे या व इतर प्रकारच्या कामांवर परिणाम होत आहे. भाडेवाढीच्या दिवशी तर अनेक मार्गावरील बसफेºया रद्द झाल्या होत्या. काही ठिकाणच्या फेºया उशिराने गेल्या. यात महामंडळाचे नुकसान झाले. बसेस वेळेत दुरुस्त होत नसल्याची या विभागात नेहमीची ओरड आहे. पंढरपूर यात्रा जवळ आली आहे. यासाठी ७० ते ८० बसेस सोडल्या जाणार आहे. अशावेळी स्थानिक पातळीवर बसचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे आगारात दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या बसेसची कामे तातडीने होण्याची गरज आहे. यासाठी अधिकाºयांना खंबीर भूमिका घ्यावी लागणार आहे.मार्ग बदलविला, मात्र भाडे कायमयवतमाळ बसस्थानक ते वडगावपर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्याने या भागातून जाणाºया बसेसचा मार्ग बदलविण्यात आला आहे. लोहारा, भोयर, वाघाडी असा जवळपास सात ते नऊ किलोमीटरचा फेरा घेऊन बस आर्णी मार्गावर जात आहे. एक टप्प्यापेक्षा अधिक प्रवास या मार्गाने जाणाºया बसेसचा वाढला आहे. अशावेळी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन भाडेवाढ अपेक्षित होती. हा निर्णय न झाल्याने महामंडळाचे दररोज किमान तीन ते चार हजार रुपयांचे नुकसान होत आहे. शारदा चौक ते भोसा मार्गाचे काम सुरू असताना पांढरकवडा बायपासवरून वाहतूक वळविण्यात आली होती. त्यावेळी महामंडळाने घाटंजी मार्गावरील बसचे भाडे वाढविले होते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ