एसटी वाहकाच्या खुनात लोहारातील तरुण अटक
By Admin | Updated: November 5, 2015 02:55 IST2015-11-05T02:55:03+5:302015-11-05T02:55:03+5:30
येथील धामणगाव मार्गावर निर्जनस्थळी झालेल्या एसटी वाहकाच्या खून प्रकरणात शहर पोलिसांनी लोहारा येथील

एसटी वाहकाच्या खुनात लोहारातील तरुण अटक
यवतमाळ : येथील धामणगाव मार्गावर निर्जनस्थळी झालेल्या एसटी वाहकाच्या खून प्रकरणात शहर पोलिसांनी लोहारा येथील एका तरुणाला बुधवारी सायंकाळी अटक केली. त्याने दगडाने ठेचून खुनाची कबुली पोलिसांपुढे दिली आहे.
शुभम लोकेश नागोसे (२४) रा. लोहारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कमलेश शंकरप्रसाद शुक्ला (५०) असे खून झालेल्या वाहकाचे नाव आहे. २५ आॅक्टोबर रोजी धामणगाव मार्गावरील एका शाळेच्या मागे निर्जनस्थळी कमलेशचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा खून असल्याचे तपासात पुढे आले. मात्र कोणताही पुरावा आरोपींनी या ठिकाणी ठेवला नव्हता. शहर पोलिसांनी याचा तपास केला असता दहाव्या दिवशी या प्रकरणाचा उलगडा झाला आणि ंआरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहक शुक्ला आणि आरोपी नागोसे यांची बसस्थानकावर काही महिन्यापूर्वी ओळख झाली होती. घटनेच्या दिवशी शुक्ला आणि नागोसे या दोघांनी मद्यपान केले. त्यानंतर सायंकाळी दारू पिण्यासाठी धामणगाव मार्गावर गेले. तेथून शाळेमागील निर्जनस्थळी गेले असता त्या दोघात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात नागोसे याने मोठा दगड उचलून शुक्ला यांच्या डोक्यात मारला. ते निपचित पडल्याचे लक्षात येतात आरोपीने घटना स्थळावरून पळ काढला, अशी कबुली पोलिसांपुढे आरोपीने दिली. (प्रतिनिधी)