एसटी बस चालकाला दोन वर्षांची शिक्षा
By Admin | Updated: March 15, 2015 00:26 IST2015-03-15T00:26:56+5:302015-03-15T00:26:56+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बसने उभ्या टेम्पोला धडक देवून चालकाला ठार केल्याप्रकरणी एसटी बस चालकाला येथील न्यायदंडाधिकारी एन.एस. बेदरकर यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

एसटी बस चालकाला दोन वर्षांची शिक्षा
पुसद : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने उभ्या टेम्पोला धडक देवून चालकाला ठार केल्याप्रकरणी एसटी बस चालकाला येथील न्यायदंडाधिकारी एन.एस. बेदरकर यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
दिगंबर आनंदराव घुगे असे शिक्षा झालेल्या एसटी बस चालकाचे नाव आहे. धुंदी घाटात टेम्पो (एम.एच.२८/एच-६७९३) उभा होता. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी बस (एम.एच.१२/ईआर-६९७२) चा चालक दिगंबर घुगे याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून टेम्पोला जबर धडक दिली. यात टेम्पो चालक सुनील लक्ष्मण राऊत याला गंभीर दुखापत होवून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दिग्रस येथील प्रवीण झोडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक दिगंबर घुगेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चौकशी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. याप्रकरणात सरकारी वकील अॅड. राजेश जयस्वाल यांनी युक्तिवाद केला. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यावरून दिगंबर घुगेविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने त्याला दोन वर्षांची शिक्षा आणि नुकसान भरपाई म्हणून मृताच्या नातेवाईकांना २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे. (प्रतिनिधी)