मराठा सेवा संघाचे विचार घराघरात पोहोचवा
By Admin | Updated: June 18, 2017 00:58 IST2017-06-18T00:58:02+5:302017-06-18T00:58:02+5:30
मराठा सेवा संघ ही सेवाभावी संस्था आहे. मराठा-कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास करणे हाच मूळ उद्देश आहे.

मराठा सेवा संघाचे विचार घराघरात पोहोचवा
पुरुषोत्तम खेडकर : पुसद येथे जनसंवाद सभा, दहावी-बारावीच्या गुणवंतांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : मराठा सेवा संघ ही सेवाभावी संस्था आहे. मराठा-कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास करणे हाच मूळ उद्देश आहे.मराठा सेवा संघाची लोककल्याणकारी भूमिका घराघरात पोहोचवा असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले.
पुसद तालुका मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने शिवाजी विद्यालयाच्या देवराव पाटील चोंढीकर सभागृहात मराठा जनसंवाद सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.दिलीप महाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवा संघाचे प्रचारक प्रा.अर्जुन तनपुरे, जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर जगताप, जिल्हा सचिव प्रा.प्रकाश लामणे, जिल्हा निवड समिती अध्यक्ष वसंतराव देशमुख उपस्थित होते. यावेळी मराठा-कुणबी समाजातील दहावी बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तर पुसद अर्बन बँकेची निवडणूक दुसऱ्यांदा अविरोध केल्या बद्दल शरद मैंद, प्रभाकर टेटर, प्रकाश बेदे्र, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष शुभांगी पानपटे, सचिव छाया लामणे यांचा सत्कार करण्यात आला. तर समाजाच्यावतीने अॅड.खेडेकर यांचाही गौरव करण्यात आला. संचालन चंद्रकांत ठेंगे यांनी तर आभार सुधीर देशमुख यांनी मानले. यावेळी नंदकुमार खंदारे यांनी जिजाऊ वंदना सादर केली. कार्यक्रमाला अॅड.आशीष देशमुख, अनिरुद्ध पाटील, संभाजीराव टेटर, प्रकाश पानपटे, प्रवीण कदम, जीवबा जाधव, हरगोविंद कदम, शिवाजी कदम, बाळासाहेब साबळे, किरण देशमुख, पंडितराव देशमुख, यशवंत चौधरी, नंदकुमार खंडारे उपस्थित होते.