जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी सक्रिय व्हावे

By Admin | Updated: July 12, 2015 02:42 IST2015-07-12T02:40:39+5:302015-07-12T02:42:24+5:30

जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला पुढे नेण्यासाठी क्रीडा संघटना व असोशिएशनची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.

Sports organizations in the district should be active | जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी सक्रिय व्हावे

जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी सक्रिय व्हावे

यवतमाळ : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला पुढे नेण्यासाठी क्रीडा संघटना व असोशिएशनची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. या संघटनांनी सक्रिय राहण्यासोबतच प्रत्येक खेळाला प्रोत्साहनासाठी लेखी सूचना आणि प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र्र प्रताप सिंह यांनी केल्या.
जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, कार्यकारी अभियंता रमेश होतवाणी, मुख्याधिकारी रवींद्र पांढरे, शिक्षण अधिकारी सुचिता पाटेकर यांच्यासह क्रीडा संघटना व क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. यात डॉ.प्रकाश नंदुरकर, रामदास दरणे, राजू जॉन, प्रदीप गाबडा, राकेश शर्मा, अनंत पांडे, सुभाष डोंगरे, मनीषा आकरे, गोपाल घोडमारे, राहुल ढोणे, धनंजय लोखंडे, शशांक देशमुख, जितेंद्र सातपुते, अविनाश लोखंडे यांचा समावेश आहे.
क्रीडा क्षेत्राला पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांचे पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण येथे घेण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
क्रीडा संघटनांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी झाला पाहिजे. त्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि परिषदेवर संघटनेचे पदाधिकारी निमंत्रित म्हणून नेमण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. शासनाच्या विविध योजनेतून क्रीडांगण विकासअंतर्गत जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच शासनाच्या मालकीच्या क्रीडांगणांचा प्राधान्याने विकास केला जावा. त्यानंतर अन्य क्रीडांगणांसाठी निधी मंजूर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना प्रमाणपत्रासह मेडल देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्यात काहीजण आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा खेळलेले आहेत. त्यांचा प्रमाणपत्राद्वारे सन्मान केला जाईल. यासाठी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दिवस निश्चित करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. (वार्ताहर)

Web Title: Sports organizations in the district should be active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.