मिशन डिप निळोणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: April 29, 2016 02:33 IST2016-04-29T02:33:53+5:302016-04-29T02:33:53+5:30

मागिल वर्षापासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणातून लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

Spontaneous response to Mission Dip Neelona | मिशन डिप निळोणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मिशन डिप निळोणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकसहभाग : १३ बूथवरून नागरिकांनी दिली मदत
यवतमाळ : मागिल वर्षापासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणातून लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यावर्षी यावर्षी एक लाख ट्रॅक्टर गाळ काढून धरणाची जलसाठवणूक क्षमता तीन लाख क्यूबीक मिटरने वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी येणारा खर्च बघता गुरुवारी शहरातील तेरा ठिकाणी बूथ लावण्यात आले. या बूथवर यवतमाळकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. किमान सात-आठ लाख रुपये जमा झाले असल्याचा अंदाज या मिशनचे कार्यकर्ते सुरेश
राठी यांनी लोकमत कडे व्यक्त
केला.
मागील वर्षी मिशन डिप निळोणा अंतर्गत शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून ३५ हजार ट्रॅक्टर गाळ काढून जल साठवणूक क्षमता एक लाख क्युबीक मिटरने वाढविण्यात आली. आता यातून एक महिन्याचा जलसाठा निळोणा धरणात वाढणार आहे. यावर्षीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्च येणार आहे.
त्यामुळे प्रयास यवतमाळतर्फे जनतेने यासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले होते. लोकसहभागातून मदत मिळवून देण्यासाठी शहरात तेरा विविध ठिकाणी बूथ उभाण्यात आले होते. सकाळी ९ ते सायंकाळी सहापर्यंत तर कळंब चौक, शारदा चौक व दत्त चौक या ठिकाणी रात्री ११ पर्यंत हे बूथ सुरू सुरू ठेवण्यात आले होते. जनतेकडून या ठिकाणी थेट मदत स्वीकारण्यात आली. तर अनेकांनी संकेतस्थळावर भेट देऊनसुद्धा देणगी दिली.
या मोहिमेत प्रयास संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर अनेक नागरिकांनी परिश्रम घेऊन निधी उभारण्यामध्ये योगदान दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Spontaneous response to Mission Dip Neelona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.