पुसद येथे तरुणांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:39 IST2021-05-17T04:39:15+5:302021-05-17T04:39:15+5:30
पुसद : स्वतःसह इतरांनाही रक्तदानाच्या चळवळीत सहभागी करून घेणाऱ्या येथील लल्ला उर्फ राधेश्याम दिंडे यांच्या पुढाकाराने गरजू रुग्णांचे जीव ...

पुसद येथे तरुणांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान
पुसद : स्वतःसह इतरांनाही रक्तदानाच्या चळवळीत सहभागी करून घेणाऱ्या येथील लल्ला उर्फ राधेश्याम दिंडे यांच्या पुढाकाराने गरजू रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
येथील मेडिकेअर ब्लड बँक येथे शिबिर घेण्यात आले. त्यानंतर भुकेलेल्यांना अन्न देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा कार्यक्रम तालुक्यातील धुंदी येथील अनाथाश्रमात घेण्यात आला. सोबतच माणुसकीची भिंत येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश लोंढे, पवन राठोड, गुरू उच्चाडे, नेहाल वानखेडे, पवन पोले, विकास शिंदे, महेश बेरगड, शैलेश वाघमोडे, गुड्डू मदने, कपिल जाधव, सुरेश आव्हाड, विठ्ठल डाखोरे, परी पवार, आदित्य जाधव आदींनी साथ दिली. कपील जाधव, शिवानंद हुलकाने, निहाल वानखेडे, उमेश महापुरे, अजय दिंडे, विकास शिंदे, सचिन खंदारे, सोपाल राठोड, पवन चव्हाण, अंकुश राठोड आदींनी रक्तदान केले.