शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर हजारोंचा खर्च, उत्पन्नाची नाही हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:29 IST

Yavatmal : नैसर्गिक आपत्तीमुळेही बसतोय फटका

जब्बार चीनीलोकमत न्यूज नेटवर्क वणी : शेतकऱ्यांच्या अडचणींचा आलेख दिवसेंदिवस वाढताच चाललेला आहे. यंदाही त्यात आणखी भर पडली. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यात अतिवृष्टीने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीमुळे भरघोस उत्पन्नाची कोणतीही शाश्वती शेतकऱ्यांना राहिली नाही. दरम्यान, उत्पन्नाची शाश्वती नसतानाही शेतकऱ्यांना हजारोंचा उत्पादन खर्च करावा लागत आहे. विशेषतः या भागातील सोयाबीनच्या पिकाबाबत हे चित्र दिसत आहे. हजारोंचा खर्च उत्पन्नाची नाही हमी अशी स्थिती बनली आहे.

यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी जवळपास एकरी २५ हजार खर्च करावा लागला. एवढा खर्च करूनही म्हणावे तसे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. उत्पादनात घट त्यात बाजारातही शेतीमालाला कवडीमोल किंमत त्यामुळे उत्पादन खर्च हा नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या अंगलट असणार आहे हे नक्की. शेतकऱ्यांनी नुकसानीची शेती करून रोजचा खर्च, बँकेचे कर्ज, मुलांचे शिक्षण, आरोग्य आदींसाठी खर्च कुठून करायचा, असा मोठा प्रश्न आहे. परिणामी दुसरीकडे राज्यकर्ते त्यांचे सोयीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. मतांसाठी घोषणांचा पाऊस पडत आहे. 

मात्र, सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या योजनांच्या पावसाचा थेंबही अजून पोहोचला नाही. दरम्यान, दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर विमा आणि अनुदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. एकीकडे सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे, तर दुसरीकडे तेच सोयाबीन काढणीसाठीचा दर हमीभावापेक्षा जास्त आहे. सोयाबीनचा यंदाचा हमीभाव चार हजार ८९२ रूपये आहे. मात्र बाजारात चार हजार २०० ते चार हजार ६०० दर मिळत आहे. दुसरीकडे सोयाबीन काढणीचा दरएकरी साडेपाच ते ६ हजार इतका आहे. म्हणजे काढणीचा दर सोयाबीनच्या बाजारभावापेक्षाही जास्त आहे. शिवाय शेतात काम करणाऱ्या मजुराला ५०० ते एक हजार रुपये मजुरी द्यावी लागते. तोच शेतकऱ्यांना मात्र चार महिन्यांमधील पिकाचा हिशोब केल्यास प्रतिदिन ५४ ते १२५ रुपये पडतात, जे मजुरांच्या मजुरीहूनही कमी आहेत. 

अशी आहे आकडेमोडसोयाबीन पिकाचा कालावधी ४ महिने, एकरी उत्पादनाचा अंदाज ५ ते ८ क्विंटल, बाजार भावाप्रमाणे उत्पन्न ३० ते ४० हजार, झालेला खर्च २३ हजार ५०० रुपये, शेतकऱ्यांना निव्वळ उत्पन्न सहा हजार ते १५ हजार रुपये.

एकरी उत्पादन खर्च पेरणीपूर्व मशागत - ३०००पेरणी - ८००बियाणे - ३०००खत - १५००फवारणी ५५०० काढणी ५५०० हमाली - वाहनभाडे  - १०००एकूण खर्च - २३,५००

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र