शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

एक कोटी खर्च, तरीही आजंतीत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:05 IST

मलकोजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि खाकीनाथ महाराजांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील आजंती येथे ओंजळभर पाण्यासाठी आजही गावकºयांना संघर्ष करावा लागतो.

ठळक मुद्देतिघांच्या मृत्यूने प्रश्न ऐरणीवर : राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : मलकोजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि खाकीनाथ महाराजांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील आजंती येथे ओंजळभर पाण्यासाठी आजही गावकºयांना संघर्ष करावा लागतो. गत ३० वर्षांपासून पाणीटंचाईच्या उपाययोजनांवर तब्बल १ कोटी रुपये खर्च झाले. मात्र गावकºयांची तहान भागली नाही. दोन दिवसापूर्वी तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूनंतर पुन्हा आजंतीचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गेलेल्या या तिघांवर काळाने झडप घातली होती.नेर तालुक्यातील आजंती (खाकी) हे गाव पाणीटंचाईसाठी कुप्रसिद्ध. दोन दिवसापूर्वी पाणीटंचाईचा प्रश्न घेऊन महसूल राज्यमंत्र्यांकडे गेलेल्या राहुल काळे, अंकुश जुनघरे, घनश्याम श्रृंगारे या तिघांचा अपघाती मृत्यू झाला. पाणी टंचाईचा प्रश्न सोडवून गावात येताना काळाने झडप घातली. या तिघांच्या बळीनंतर पाणीटंचाईचा मुद्दा ऐरणीवर आला असून गत ३० वर्षांचा लेखाजोगा बघितला तर आतापर्यंत एक कोटी रुपये खर्च होऊन पाणीटंचाई संपली नसल्याचे दिसत आहे. १९९५ साली मोझर येथे आजंतीसाठी विहीर खोदण्यात आली. मात्र आजंतीत पाणी पोहोचलेच नाही. जीवन प्राधिकरणाने खोदलेली विहीर कोरडी निघाली. २००४ साली १७ लाख रुपये खर्च करून नेर येथून पाणी व्यवस्थापन केले. परंतु ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने ही योजना अडगळीत पडली. सध्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणीसाठा अडविण्यात आला. २०१५ ला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ३९ लाखांची योजना कार्यान्वित केली. ५० हजार लिटरची टाकी बसविण्यात आली. परंतु ग्रामपंचायतीने ही योजना अद्याप हस्तांतरितच केली नाही. सचिवाला पाणीपुरवठा विभागाने वारंवार पत्र दिले. परंतु विहिरीला पाणी नसल्याचे कारण पुढे करीत हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे गावात बांधलेली पाण्याची टाकी शोभेची वस्तू झाली आहे. वास्तविक या योजनेत मोठा घोळ असून चुकीची पाईपलाईन टाकण्यात आल्याने ही योजना नावालाच उरली आहे.३० वर्षापूर्वी या गावातील वसंत भोजाजी राठोड व सुभाष चोपडे यांच्या शेतातील विहिरीत उतरुन गडव्याने बादली भरावी लागत होती. आज ३० वर्षानंतर एक कोटींच्या योजना कुचकामी ठरल्याने तीच वेळ कायम आहे. २०१५ ला गाव टँकरमुक्त घोषित झाले होते. विहिरीत नळ योजनेच्या विहिरीतून पाणी सोडण्यात आले होते. परंतु त्यानंतर ना नळ सुरू झाले ना पाणीटंचाई संपली.अनेकांनी सोडले गावआजंती येथील पाणीटंचाईची दाहकता भयंकर आहे. गावात सोयरीकीसाठी पाहुणे येताना पहिल्यांदा पाणीटंचाईचाच मुद्दा पुढे करतात. अनेक जण तर मुलगी देताना विचार करतात. पाणीटंचाईपुढे हात टेकलेल्या अनेकांनी आता गाव सोडून नेर किंवा इतर ठिकाणी मुक्काम हलविला आहे.हीच खरी श्रद्धांजली ठरेलराहूल काळे, अंकुश जुनघरे, घनश्याम श्रृंगारे हे तीन तरुण गावातील पाणी समस्या संपुष्टात आणण्यासाठी अविरत परिश्रम घेत होते. अपघाताच्या दिवशीही या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ते महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना भेटले होते. आता त्यांच्या मृत्यूनंतर या गावाची नळ योजना कार्यान्वित करून प्रशासन त्यांना खरी श्रद्धांजली वाहणार का असा प्रश्न आहे.आजंती येथील नळ योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांनी या योजनेला सहकार्य करावे.- भाग्यलक्ष्मी राठोडसरपंच, आजंतीपाणीटंचाईने त्रस्त होऊन आजंती येथील नागरिक गाव सोडत आहे. पाणीटंचाई पाचवीला पुजली आहे. माझे जीवाभावाचे सखे ज्यांनी सामाजिक कार्यात मोलाची भूमिका बजावली, त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पाणीटंचाई कायमची संपुष्टात आणावी.- किशोर अरसोड,सामाजिक कार्यकर्ते, आजंती