भिरभिरत्या नजरेने सुंदराबाई शोधते नातेवाईक

By Admin | Updated: May 16, 2015 00:22 IST2015-05-16T00:22:52+5:302015-05-16T00:22:52+5:30

महिनाभरापूर्वी अपघातग्रस्त सुंदराबाईला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले.

Spectacularly looking for Sundarabai with gorgeous eyes | भिरभिरत्या नजरेने सुंदराबाई शोधते नातेवाईक

भिरभिरत्या नजरेने सुंदराबाई शोधते नातेवाईक

रुग्णालयातच मुक्काम : अपघातात जायबंदी झाल्यानंतर घरच्यांनी सोडले वाऱ्यावर
रूपेश उत्तरवार यवतमाळ
महिनाभरापूर्वी अपघातग्रस्त सुंदराबाईला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. आता महिना लोटला मात्र तिला घरी नेण्यासाठी कुणीच आल नाही. रुग्णालयात येणाऱ्या जाणाऱ्यांकडे भिरभिरत्या नजरेने पाहत ती त्यांच्या आपले नातेवाईक शोधत आहे. मात्र त्यांचा थांगपत्ता नाही. दुसरीकडे रुग्णालयात किती दिवस ठेवायचे म्हणून डॉक्टरांनी सुटीची तयारी सुरू केली. अशा अवस्थेत जायचे कसे आणि कुठे असा प्रश्न ८० वर्षीय सुंदराबाई यांना पडला आहे.
डोबरी वरझडीच्या सुंदराबाई बडे या ८० वर्षीय वृध्देला महिनाभरापूर्वी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपघात विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या २३ क्रमांकाच्या वार्डात उपचार घेत आहे. अपघातात तिच्या पायाला जबर मार लागला होता. तिच्यावर उपचार करून पायला प्लास्टर करण्यात आले. उपचारानंतर तिला घरी नेण्यासाठी कुणीच आले नाही. आज नाही तर उद्या येतील अशा प्रतीक्षेत डॉक्टरांनी महिनाभर प्रतीक्षा केली. मात्र सुंदराबाईचा नातेवाई फिरकला नाही. आता किती दिवस प्रतीक्षा करायची म्हणून तिला सुटी देण्याचा विचार डॉक्टरांनी सुरू केला. सुंदराबाई असह्य वेदनेने विव्हळत आहे. माझी यातून सुटका करा, अशा विनवणी ती करीत आहे. मात्र तिच्या कुणाचेही लक्ष जात नाही.
सुंदराबाई डोबरी वरझडीत पतीसोबत राहत होती. अशी ती सांगते, तिच्या मालकाची चहाटपरी होती. पतीच्या जाण्याने ती उघड्यावर आली. अपघात कसा झाला हे तिला आठवत नाही. मुलांबाबत विचारताच ती एकदम आक्रमक होते. कोणी कोणाचा नाही. तुम्हीच आमचे मायबाप, पोरं आहत अशी ती सांगते.

कौतिकाबाईची व्यथाच न्यारी
शासकीय रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक २३ मध्ये कौतिकाबाई यशवंत सुने (७०) ही दुसरी वृद्धा उपचार घेत आहे. नेर तालुक्यातील मोझरची ती रहीवाशी आहे. वादळात तिच्या घरावरील टिनपत्रे उडाले आणि त्यावरील दगड पडल्याने ती जखमी झाली. तिच्या दोन्ही पायाला जबर मार लागला. तहसील प्रशासनाने १० हजाराची मदत केली. मात्र तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी लागणारा पैसा तिच्या जवळ नाही. औषध उपचारासाठी पैसे नाही. अशा अवस्थेत वेदनेने ती विव्हळत आहे.

प्रशासनातील माणुसकी
हा संपूर्ण विषय निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या कानावर आला. त्यांनी सुंदराबाईला वृध्दाश्रमापर्यंत नेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शासकीय कागदपत्राची पूर्तता प्रशासनाला करावी लागणार आहे. यासोबत कौतिकाबाईचा प्रश्न सोडविण्यासाठी कोण पुढे येणार हा प्रश्न आहे.

Web Title: Spectacularly looking for Sundarabai with gorgeous eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.