लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या निळोणा व चापडोह प्रकल्पाने तळ गाठला. त्यातील मृत पाणीसाठ्यातून पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने एक कोटी ६६ लाखांचा आराखडा केला. यात नगरपरिषदेला १0 टक्के रक्कम लोकवर्गणी म्हणून द्यावयाची आहे. त्यासाठी बुधवारी विशेष सभा घेतली जाणार आहे.निळोणा व चापडोह प्रकल्पातून मार्च महिन्यापर्यंत यवतमाळकरांना पाणी मिळण्यासाठी जीवन प्राधिकरण उपाययोजना करीत आहे. निळोणाच्या मृत साठ्याचा वापर करण्यासाठी ७३ लाख ९४ हजार खर्च अपेक्षित आहे. चापडोहमधून पाणी काढण्यासाठी २९ लाख ४८ हजार, तर निळोणा व चापडोह धरणात पंप लावण्यासाठी ६३ लाख ३६ हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. त्यासाठी पालिकेकडून १0 टक्के लोकवर्गणी अपेक्षित आहे. ही लोकवर्गणी देण्यासाठीच बुधवारी विशेष सभा आयोजित केली आहे.नगरपरिषद लोकवर्गणीची रक्कम तातडीने जीवन प्राधिकरणाला देणार आहे. याकरिता चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून तरतूद केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी सांगितले.
पाण्यासाठी आज विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:36 IST
शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या निळोणा व चापडोह प्रकल्पाने तळ गाठला. त्यातील मृत पाणीसाठ्यातून पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने एक कोटी ६६ लाखांचा आराखडा केला. यात नगरपरिषदेला १0 टक्के रक्कम लोकवर्गणी म्हणून द्यावयाची आहे.
पाण्यासाठी आज विशेष सभा
ठळक मुद्देनगरपरिषद : चापडोह, निळोणा प्रकल्पातील मृत साठ्यावर भिस्त