सभापती पंकज तोडसामविरुद्ध अविश्वास ठराव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST2021-07-16T04:28:45+5:302021-07-16T04:28:45+5:30

पांढरकवडा : येथील पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती पंकज तोडसाम यांच्याविरोधात आठपैकी सहा सदस्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. ...

Speaker Pankaj Todsam files no-confidence motion | सभापती पंकज तोडसामविरुद्ध अविश्वास ठराव दाखल

सभापती पंकज तोडसामविरुद्ध अविश्वास ठराव दाखल

पांढरकवडा : येथील पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती पंकज तोडसाम यांच्याविरोधात आठपैकी सहा सदस्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. या अविश्वास ठरावामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे आठपैकी पाच सदस्य शिवसेनेचे आहेत. यातील बहुसंख्य सदस्य पारवेकर गटाचे आहेत. सदस्यांना विश्वासात न घेता काम करणे, सन्मानजनक वागणूक न देणे, घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी न करणे, उद्धटपणे वागणूक देणे, आदी ठपका ठेवून सभापती तोडसाम यांच्याविरोधात हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर उपसभापती नरेंद्र नांदूरकर, संतोष बोडेवार, राजेश पसलावार, इंदू मिसेवार, शीला गेडाम, अनुराधा वेंट्टी या सहा सदस्यांच्या सह्या आहेत. सह्या करण्यात आलेल्या सहा सदस्यांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले चार, भाजपचा एक व राष्ट्रवादीच्या एका सदस्याचा समावेश आहे.

Web Title: Speaker Pankaj Todsam files no-confidence motion