रस्त्यावर उभी वाहने पाहून एसपी बरसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2015 02:25 IST2015-07-18T02:25:38+5:302015-07-18T02:25:38+5:30

शहरातील बेशिस्त वाहतुकीचा फटका खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनुभवला. येथील पाचकंदील चौकातील जिल्हा बँकेसमोर अनेक वाहाने रस्त्याच्या मधोमध उभी होती.

The SP used to see the vehicles on the road | रस्त्यावर उभी वाहने पाहून एसपी बरसले

रस्त्यावर उभी वाहने पाहून एसपी बरसले

पाचकंदील चौक : जिल्हा बँक प्रशासनाला तंबी
यवतमाळ : शहरातील बेशिस्त वाहतुकीचा फटका खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनुभवला. येथील पाचकंदील चौकातील जिल्हा बँकेसमोर अनेक वाहाने रस्त्याच्या मधोमध उभी होती. हे पाहून पोलीस अधीक्षकांचा पारा भडकला. त्यांनी स्वत: हातात दांडा घेऊन तातडीने वाहाने काढायला लावली. शिवाय जिल्हा बँकेच्या प्रशासनाला तंबी देऊन त्यांची वाहाने योग्य पार्किंगच्या ठिकाणीच लावावी असे सांगितले.
पोलीस मुख्यालयातील शांतता कमिटीची बैठक आटोपून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जात असताना पाचकंदील चौकात ट्राफिक जाम झालेले आढळले. त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकाला वाहातूक सुरळीत करण्यासाठी पाठविले. मात्र महाराष्ट्र शासन लिहिलेलेच वाहान रस्त्याच्या मधोमध उभे होते. विचारणा करूनही कुणी गाडी काढण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या पारा भडकला. त्यांनी स्वत: हातात दांडा घेऊन दरडावले. हा प्रकार पाहून शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. काही क्षणातच रस्त्यावर उभी असलेली अनेक वाहाने तातडीने हलविण्यात आली.
यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचेही चारचाकी वाहान रस्त्यावर उभे होते. आता यापुढे असला प्रकार दिसल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पोलीस अधीक्षकांनी दिले.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The SP used to see the vehicles on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.