खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST2020-09-29T05:00:00+5:302020-09-29T05:00:31+5:30
यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली. हे सोयाबीन अती पावसाने बहुतांश भागात कुबेरले आहे. थोडेबहुत वाचलेले सोयाबीन बाजारात विक्रीस येणार आहे. सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट नोंदविली जाणार आहे. यानंतरही खुल्या बाजारात सोयाबीनचे दर तीन हजारांपर्यंत खाली आले आहे.

खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना बाजारपेठेतही दर घसरण्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. खुल्या बाजारात सोयाबीन येण्यापूर्वीच शेतमालाचे दर घसरले आहे. यामध्ये एक हजार रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे.
यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली. हे सोयाबीन अती पावसाने बहुतांश भागात कुबेरले आहे. थोडेबहुत वाचलेले सोयाबीन बाजारात विक्रीस येणार आहे. सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट नोंदविली जाणार आहे. यानंतरही खुल्या बाजारात सोयाबीनचे दर तीन हजारांपर्यंत खाली आले आहे.
यवतमाळसह जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरातील घसरण पाहायला मिळत आहे. जुन्या सोयाबीनला तीन हजार ५०० ते तीन हजार ९०० प्रती क्विंटलचा दर मिळत आहे, तर नवीन सोयाबीनला तीन हजार ते तीन हजार २०० असा दर आहे. यामुळे शेतकºयांना लागवड खर्चही निघणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने हमी दर जाहीर केले. मात्र हमी केंद्र अद्यापही उघडले नाही. यामुळे शेतकºयांनी आपला शेतमाल खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला आहे. याठिकाणी एमएसपीच्या खाली शेतमालाची खरेदी होत आहे. शासकीय बाजार समिती आणि खासगी बाजार समिती या दोनही ठिकाणी शेतकºयांना दर घसरणीचा सामना यावर्षी करावा लागणार आहे.
काळपट पांढरे सोयाबीन
कोंब फुटल्याने अनेकांना सोयाबीन घरातही आणता आले नाही. अर्ली व्हेरायटी लागवड केलेल्या शेतकºयांना या नुकसानीचा फटका बसला. यासोबतच ३३५ सारख्या नव्या वाणालाही नुकसानीचा सामना करावा लागला. आता वाचलेल्या सोयाबीनमध्ये काळपट आणि पांढरे डाग पाहायला मिळत आहे. यामुळे हे सोयाबीन बिजोत्पादनासाठीही कमकुवत असण्याची शक्यता आहे. यातून तेल आणि ढेप याची गुणवत्ता कमी प्रतीची राहण्याची शक्यता आहे.