सोयाबीनवर चक्रीभुंगा व खोडमाशी

By Admin | Updated: September 5, 2015 02:49 IST2015-09-05T02:49:20+5:302015-09-05T02:49:20+5:30

यावर्षी आधी पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. पंरतु उशीरा का होईना पावसाने हजेरी लावल्यामुळे सध्या पिके हवेवर डोलू लागली आहेत.

Soybean and tropical clay | सोयाबीनवर चक्रीभुंगा व खोडमाशी

सोयाबीनवर चक्रीभुंगा व खोडमाशी

कृषी विभागाची माहिती : अखेर हिवरी परिसरात पीक पाहणी
हिवरी : यावर्षी आधी पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. पंरतु उशीरा का होईना पावसाने हजेरी लावल्यामुळे सध्या पिके हवेवर डोलू लागली आहेत. परंतु सोबतच चक्रीभुंगा व खोडमाशीचा प्रादूर्भाव झाला आहे. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आवश्यक असताना कृषी विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. याबाबतचे सविस्तर वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच कृषी विभागाला जाग येऊन त्यांनी बुधवारी हिवारी परिसरात पीक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पिकांवरील किड, रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प २०१५-१६ अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी डी.एस. प्रधान यांनी हिवरीसह जवळा (ई), बेचखेडा, भांब, वाई, मनपूर या गावांना भेटी देऊन पिकांची पाहणी केली. सध्या सोयाबीनचे पीक हे दाने भरण्याच्या अवस्थेत असून सोयाबीनवर असून सोयाबीनवर चक्रीभुंगा, खोडमाशी, तंबाखुची पाने खाणारी अळी, उंट अळीचा प्रादुर्भाव कृषी अधिकारी प्रधान यांना दिसून आला. यासाठी त्यांनी काही उपाययोजनाही शेतकऱ्यांना सांगितल्या आहेत. शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी किड निरीक्षक आर.डी. मनवर, सहायक एस.बी. सोईनवार, प्रफुल्ल मनवर ताई बारपत्रे यांची उपस्थिती होती. सरपंच नितीन गावंडे, गितेश काकस, अनिल गावंडे, रितेश काकस, महेश निवल, किशोर सरोदे, सुरेंद्रसिंह काकस, दत्तात्रेय गावंडे, शे.कासम शे. आनसा, विनोद काटे, काटे मामा, दिवाकर भगत, मुरलीधर लांडळे, राजेंद्र गिरी आदींसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. (वार्ताहर)

Web Title: Soybean and tropical clay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.