शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
7
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
8
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
9
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
10
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
11
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
12
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
13
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
14
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
15
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
16
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
17
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
18
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
19
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
20
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

दोन लाख हेक्टरवर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानसूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तब्बल दोन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान हवामान खात्याने २२ जूनपर्यंत उघडीप राहणार असल्याचा अंदाज वर्तविला. या काळात शेतकऱ्यांनी सिंचनाची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर ...

ठळक मुद्दे२२ जूनपर्यंत पावासाची उघडीप : जिल्ह्यात सर्वाधिक लागवड क्षेत्र कपाशीचे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानसूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तब्बल दोन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान हवामान खात्याने २२ जूनपर्यंत उघडीप राहणार असल्याचा अंदाज वर्तविला. या काळात शेतकऱ्यांनी सिंचनाची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. यामधील एक लाख ३० हजार ९९४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. २० हजार २६८ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. १६ हजार ६१५ हेक्टरवर तूर, १२५० हेक्टरवर मूग, १०५० हेक्टरवर उडीद, ६६ हेक्टरवर ज्वारी आणि २४३० हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली.१२ ते २२ जूनपर्यंत जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार आहे. या काळात पिकांना ताण पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना घाई करू नये आणि सिंचनाची व्यवस्था असेल तरच पेरणीचा पुढाकार घ्यावा अन्यथा पेरणीसाठी प्रतीक्षा करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.एकीकडे पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप बियाणे खरेदीची तजवीज करता आलेली नाही. अद्याप पीककर्ज कधी मिळेल याच प्रतीक्षेत अनेकजण ताटकळत आहे. पाऊस पुरेसा बरसल्यावरही या शेतकऱ्यांची पेरणी पैशाविना खोळंबण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात कापसाच्या विक्रमी पेऱ्याचे संकेतयावर्षी खुल्या बाजारात कापसाचे दर तेज राहतील. असा प्राथमिक अहवाल जागतिक बाजारातून पुढे आला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल अचानक कापसाच्या लागवडीकडे वळला आहे. यातून कृषी विभागाचा अंदाजही मागे पडला आहे. पहिल्या टप्प्याच्या पेरणीत एक लाख ४० हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. आठ दिवसाच्या या अहवालाने जिल्ह्यातील कपाशी लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याचे पुढे आले आहे. ८० टक्के क्षेत्रातल्या पेरण्या बाकी आहे. कृषी केंद्रातून मोठ्या प्रमाणात कपाशीची विक्री होत आहे. यामुळे गतवर्षीपेक्षाही जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी