शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अंगात संचारला सैतान; फावड्याने मारून वडिलांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 16:21 IST

घरगुती वादातून पांढरकवडात घडली घटना : मुलाला ठोकल्या बेड्या

पांढरकवडा (यवतमाळ) : घरगुती वादातून मुलाने रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या वडिलांच्या दोन्ही पायांवर फावड्याच्या दांड्याने मारून गंभीर जखमी केले. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी आरोपी मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ही दुर्दैवी घटना पांढरकवडा शहरात २२ मे रोजी सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास शहरातील शिंदे यांच्या दुकानासमोर घडली. चक्रधर वैकुंठ भगत (५२, रा. पांढरकवडा) असे मृत वडिलांचे नाव, तर पंकज उर्फ गुड्ड्या चक्रधर भगत (२६, रा. पांढरकवडा) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या घटनेने पांढरकवडा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

२२ मे रोजी सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास पांढरकवडा शहरातील शिंदे यांच्या दुकानासमोर चक्रधर वैकुंठ भगत यांच्यासोबत त्यांचा मुलगा पंकज भगत याने वाद घातला. या वादात पंकजने त्याच्या हातातील लाकडी फावड्याच्या दांड्याने वडिलांच्या डाव्या पायावर मारून त्यांना जखमी केले. यात एकाने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, मुलाने त्याच्या वडिलांना धक्काबुक्की केली. त्यामुळे वडील खाली कोसळले. त्यात त्यांच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली.

या घटनेनंतर मुलगा तेथून निघून गेला. दरम्यान, गंभीर अवस्थेत घटनास्थळी पडून असलेल्या चक्रधर भगत यांना काहींनी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, २७ मे रोजी चक्रधर भगत यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्वत: ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी पंकज उर्फ गुड्ड्या भगत याच्याविरूद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण लिंगाडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ