सैनिक आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान व्हावा

By Admin | Updated: March 10, 2017 01:14 IST2017-03-10T01:14:57+5:302017-03-10T01:14:57+5:30

देशासाठी लढणारे सैनिक आणि त्यांच्या परिवारांचा सन्मान झालाच पाहिजे. सैनिक कुटुंबीयांबद्दल अपशब्द

The soldiers and their families should be respected | सैनिक आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान व्हावा

सैनिक आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान व्हावा

मनिंदरजितसिंह बिट्टा : उमरखेड येथे संवाद
उमरखेड : देशासाठी लढणारे सैनिक आणि त्यांच्या परिवारांचा सन्मान झालाच पाहिजे. सैनिक कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पंढरपूरच्या आमदारांवर कडक कारवाई केलीच पाहिजे, असे आॅल इंडिया अ‍ॅन्टी टेरेरिस्ट फ्रन्टचे अध्यक्ष मनिंदरजितसिंह बिट्टा यांनी येथे केले.
नांदेड येथून नागपूरकडे जाताना प्रवासादरम्यान उमरखेड येथील विनोद जैन यांच्याकडे काही काळ थांबले असता त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. बिट्टा यांच्या वाहनाचा ताफा उमरखेड शहरात येताच भारत ‘माता की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला गेला. विनोद जैन यांच्या दुकानात उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सरकार कोणाचेही असो सैनिकांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे. सार्वजनिक जीवनात वावरताना सैनिकांना सन्मान मिळाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सुमारे अर्धा तास बिट्टा या ठिकाणी थांबले होते. त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी जयघोष केला.
यावेळी विजयकुमार जैन, विनोद जैन, आदेश जैन, डॉ.अवधूत वाघमारे, विनायक कदम, अभय जैन, संदीप जैन, शंकरराव आलमे, पांडुरंग जाधव आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The soldiers and their families should be respected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.