सौरपंपाच्या जाणीवजागृतीसाठी सौररथ
By Admin | Updated: December 16, 2015 02:49 IST2015-12-16T02:49:08+5:302015-12-16T02:49:08+5:30
विजेची मागणी केल्यानंतरही वीज न पोहोचणाऱ्या ठिकाणी सौरपंप बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सौरपंपाच्या जाणीवजागृतीसाठी सौररथ
तालुक्यात मार्गदर्शन : शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्यासाठी हालचाली
यवतमाळ : विजेची मागणी केल्यानंतरही वीज न पोहोचणाऱ्या ठिकाणी सौरपंप बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांकडून योजनेसाठी अर्जच आले नाहीत. यामुळे जाणीवजागृतीसाठी तालुक्यावर सौररथ पाठविण्यात आला आहे.
सौरपंप बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ५ टक्के स्वहिस्सा भरावा लागणार आहे. यासोबतच काही शासनाच्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहे. सोबत पटवाऱ्याचा दाखला लागणार आहे. या योजनेत सौरपंप बसविण्यासाठी केवळ २५० अर्ज आले ेआहे. ही योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी सौररथ तयार करण्यात आला आहे.
प्राथमिक स्तरावर हा रथ तालुका पातळीवर पोहोचविण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना यामाध्यमातून
मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
(शहर वार्ताहर)