सोईटच्या अच्युतने साधला फूल शेतीतून विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:51+5:30

अनेक तरुण जोखीम नको म्हणून नोकरीच्या मागे धावतात. मात्र अच्युतने मनाशी ठाम निश्चिय करून फूल शेतीला सुरुवात केली. अच्युत लहान असताना त्यांची आई फुले गोळा करून ढाणकी येथे प्रत्येक दुकानदाराला हारांची विक्री करीत होत्या. त्यातून त्यांचा चरितार्थ चालत होता.

Soet Achyut led development from flower farming | सोईटच्या अच्युतने साधला फूल शेतीतून विकास

सोईटच्या अच्युतने साधला फूल शेतीतून विकास

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुळे ओढवले संकट : फुले रस्त्यावर टाकण्याची वेळ, लागवड खर्चही निघणे अवघड

उदय पुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ढाणकी : लगतच्या सोईट येथील युवा शेतकरी अच्युत मोरे यांनी फूल शेतीतून प्रगती साधली आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्यावर फुले रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.
अनेक तरुण जोखीम नको म्हणून नोकरीच्या मागे धावतात. मात्र अच्युतने मनाशी ठाम निश्चिय करून फूल शेतीला सुरुवात केली. अच्युत लहान असताना त्यांची आई फुले गोळा करून ढाणकी येथे प्रत्येक दुकानदाराला हारांची विक्री करीत होत्या. त्यातून त्यांचा चरितार्थ चालत होता. आईचे परिश्रम बघून अच्युतने लहानपणीच फूल शेतीचा ध्यास घेतला. शिकत असताना तोसुद्धा दुकानांमध्ये हार आणून द्यायचा. यातून त्याची अनेक व्यापाऱ्यांशी ओळख झाली. त्याचा लाभ घेत ढाणकीत फुलांचे दुकान टाकले. यानंतर स्वत:च्या अडीच एकर शेतात बोअरवेल खोदून फूल शेतीला सुरुवात केली.
अच्युतने शेतात गुलछडी, जरबेरा, गुलाब, लिली, झेंडू, मोगरा आदी फुलांची लागवड केली. त्यातून मिळणाºया उत्पन्नातून स्वत:सह बहीण व भावाचे लग्न केले. आतापर्यंत अच्युतने लाखोंचे उत्पन्न घेतले. कुटुंबाला आर्थिक सक्षम केले. इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे फुलांची मागणी घटली आहे. वाहतूकही ठप्प पडली. यामुळे लाखो रुपये खर्च करूनही उत्पन्नात घट आली आहे. यात अच्युतसह १५ मजुरांचे कुटुंब आर्थिक संकटात आहे. फुले तोडून रस्त्यावर टाकावे लागत आहे.

Web Title: Soet Achyut led development from flower farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.