शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

७५ वर्षीय आजोबांची ‘नेल आर्ट’द्वारे समाजसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:50 PM

रस्त्यावर पहुडलेला गरीब माणूस दोन वेळच्या जेवणासाठी मोताद आहे. त्याच्या बाजूला एक वृद्ध कलावंत उभा राहतो. एक चिटोरा घेतो. चिटोऱ्यावर नखं पटापटा खुपसून खुपसून तीन-चार सेकंदात नेटकं चित्र तयार करतो.

ठळक मुद्देउन्हाळी सुटीत मुलांना मेजवानी : नखांच्या सहाय्याने मिनिटात साकारतात सुबक चित्र

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्त्यावर पहुडलेला गरीब माणूस दोन वेळच्या जेवणासाठी मोताद आहे. त्याच्या बाजूला एक वृद्ध कलावंत उभा राहतो. एक चिटोरा घेतो. चिटोऱ्यावर नखं पटापटा खुपसून खुपसून तीन-चार सेकंदात नेटकं चित्र तयार करतो. लोकं दहा-वीस रुपयांचे बक्षीस देतात. ते सारे पैसे कलावंत त्याला जेवणासाठी देतो अन् निमूट निघून जातो... हा सिनेमा नव्हे, विजय चव्हाते नावाच्या मुग्ध चित्रकाराची समाजसेवा आहे.पुण्याचे विजय चव्हाते सध्या यवतमाळात मुक्कामी आहेत. त्यांची सून यवतमाळची आहे. व्याही उल्हास लचके यांच्याकडे ते थांबले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यांचा आस्वाद घेणाºया बच्चे कंपनीमध्ये सध्या विजय चव्हाते एक वेगळीच कला ‘फेमस’ करीत आहे. नेल आर्ट. म्हणजे, साधा कागद घेऊन त्यावर नखांचा दाब देत एखादे चित्र तयार करणे. चित्रही इतके सुबक आणि हुबेहुब की, कुणाला वाटावे शिक्काच मारलेला असावा.जे जे स्कूल आॅफ आर्ट गाजविणारे विजय चव्हाते, यांनी कलेच्या जोरावर समाधानकारक पैसा मिळविला. एम.एफ. हुसेन, बाबासाहेब पुरंदरे, बाळासाहेब ठाकरे सारख्या कलावंतांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. आता वयाच्या पंच्याहत्तरीत त्यांनी चित्रकारितेसोबतच ‘नेल आर्ट’ ही वेगळीच कला जोपासली. त्याआधारे ते गरिबांना छोटी मोठी का होईना मदत मिळवून देत आहेत.ते शाळेतील विद्यार्थ्यांना ही ‘नखचित्रे’ शिकविण्यासाठी हौसेने जातात. असेच एकदा एक गरीब विद्यार्थिनी सायकलसाठी तळमळताना त्यांना दिसली. विजय चव्हाते यांनी लगेच लोकांना नखचित्रे काढून दाखविली. लोकांनी पैसे दिले अन् ते पैसे घेऊन चव्हाते यांनी लगेच त्या विद्यार्थिनीला सायकल मिळवून दिली. पैसा मी खूप कमावला, पण आपल्या कलेमुळे इतरांना समाधान मिळवून द्यावे, हाच माझा उद्देश असतो, असे विजय चव्हाते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.मंगळवारी यवतमाळात त्यांनी सर्वांपुढे अवघ्या काही मिनिटात छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री आदींची नखचित्रे काढून दाखविली. तेव्हा प्रत्येकाने त्यांच्या कलेला दाद दिली. उन्हाळी सुटीत मुलांनी ही कला शिकून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :artकला