लोकमत सखी मंचतर्फे ‘सो स्पेझो आर्ट’ कार्यशाळा

By Admin | Updated: September 5, 2014 00:07 IST2014-09-05T00:07:40+5:302014-09-05T00:07:40+5:30

सखींना वैविध्यपूर्ण कला आत्मसात करता याव्या यासाठी लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचतर्फे कार्यशाळा घेतल्या जातात. रक्षाबंधनच्या पर्वावर नवीन काही तरी शिकता यावे यासाठी ‘सो स्पेझो आर्ट’

'So Spaso Art' Workshop by Lokmat Sakhi Forum | लोकमत सखी मंचतर्फे ‘सो स्पेझो आर्ट’ कार्यशाळा

लोकमत सखी मंचतर्फे ‘सो स्पेझो आर्ट’ कार्यशाळा

यवतमाळ : सखींना वैविध्यपूर्ण कला आत्मसात करता याव्या यासाठी लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचतर्फे कार्यशाळा घेतल्या जातात. रक्षाबंधनच्या पर्वावर नवीन काही तरी शिकता यावे यासाठी ‘सो स्पेझो आर्ट’ या कला प्रकारातील वस्तू तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात येत आहे.
शनिवार ६ सप्टेंबर रोजी येथील दर्डा मातोश्री सभागृहात दुपारी २ ते ४ या वेळात ही कार्यशाळा होत आहे. यात प्रियंका तातेड या प्रशिक्षण देणार आहे. हा कला प्रकार शिकण्यासाठीचे इंडियन हिबीकस सीट-१, टुल्स एम्बोस सीट-१, फोम पॅड, पोलनस, कँडल, क्विस्टर, सिलीकॉन आदी साहित्य कार्यशाळेत उपलब्ध करून दिले जाणार आहे. एका सीटमध्ये १० ते १२ फुले तयार होतात. ते याच ठिकाणी सजविले जाणार आहे. मात्र सजविण्यासाठी काचेची किंवा
चिनी मातीचे बाऊल, कात्री आणि कापड सोबत आणावे लागणार आहे.
यात प्रवेशासाठी सखी मंच सदस्यांना ६०० रुपये तर इतर सखींना ७५० रुपये शुल्क आहे. सखी मंच सदस्यांनी ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. नसल्यास ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या कार्यशाळेची नोंदणी सुरू असून केवळ ३० सखींना प्रवेश दिला जाणार आहे. या कार्यशाळेचा लाभ घेण्याची विनंती सखी मंच जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केली आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी सखी मंच संयोजिका शैला मिर्झापुरे (९६७३७१३३१०) यांच्याशी संपर्क करता येईल. (उपक्रम प्रतिनिधी)

Web Title: 'So Spaso Art' Workshop by Lokmat Sakhi Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.