पांढरकवडा शहरात विना परवाना वाहनांची धूम

By Admin | Updated: May 15, 2016 02:03 IST2016-05-15T02:03:54+5:302016-05-15T02:03:54+5:30

लोकसंख्येबरोबर शहर व तालुक्यात वाहनांचीही संख्याही प्रचंड वाढत आहे. तथापि, वाहन आणि परवानाधारकांच्या संख्येत प्रचंड तफावत दिसून येत आहे.

Smokeless traffic vehicles in the city of Pandharvada | पांढरकवडा शहरात विना परवाना वाहनांची धूम

पांढरकवडा शहरात विना परवाना वाहनांची धूम

अल्पवयीन चालक : आरटीओ, पोलिसांचे दुर्लक्ष
पांढरकवडा : लोकसंख्येबरोबर शहर व तालुक्यात वाहनांचीही संख्याही प्रचंड वाढत आहे. तथापि, वाहन आणि परवानाधारकांच्या संख्येत प्रचंड तफावत दिसून येत आहे. त्यामुळे विना परवाना वाहनधारकांची धूम सुरू आहे. अशी वाहने अपघाताला निमंत्रण देत आहेत.
हल्ली बहुतांश नागरिकांकडे दुचाकी आली आहे. ग्रामीण भागातही दुचाकी घरोघरी पोहोचली आहे. मात्र वाहन चालक परवाना काढण्यासाठी अनेकांची परवड होत आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक चक्क परवाना काढण्याच्या भानगडीतच पडत नाही. तेथून वाहतूक नियमांची पायमल्ली सुरू होते. पांढरकवडा शहरात वाहनांची संख्या प्रचंड झाली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्ते वाहनांनी गजबजलेले दिसतात. शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच गल्लीबोळातही वाहनांचे अतिक्रमण दिसून येते.
सध्या वाहन घेण्यासाठी कर्ज पुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे. फायनान्स कंपन्या कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकाकडे दुचाकी आली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने कुणीही, कुठेही वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. वाहनांची संख्या एवढी वाढली असताना पार्किंगची मात्र कुठेच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्यावर कुठेही आडवेतिडवे वाहन उभे केले जाते. वाहतूक पोलीस अशा वाहनांवर जुजबी दंडात्मक कारवाई करून सोडून देतात. त्यामुळे वाहनधारकांचे मनोबल चांगलेच वाढले आहे. शहर आणि ग्रामीण भागात अनेक अल्पवयीन मुले धूम स्टाईलने वाहने चालवून शहराचे स्वास्थ बिघडविण्यात अग्रेसर आहेत. भरधाव वाहनाने अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. असे वाहन अगदी जवळून गेले, की क्षणभर कुणालाही अंधारी आल्याशिवाय राहात नाही. विना परवानाधारक चालक सुसाट वेगाने वाहन चालविताना दिसून येतात. त्यातून अनेकदा अपघात घडतात. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Smokeless traffic vehicles in the city of Pandharvada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.