शेतीच्या वादातून लहान भावाचा निर्घृण खून

By Admin | Updated: June 12, 2016 02:12 IST2016-06-12T02:12:13+5:302016-06-12T02:12:13+5:30

मक्त्याच्या पैशाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील खंडापूर येथे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

Small brother's bloodless murder through farming dispute | शेतीच्या वादातून लहान भावाचा निर्घृण खून

शेतीच्या वादातून लहान भावाचा निर्घृण खून

खंडापूरची घटना : मक्त्याच्या पैशाने घेतला बळी, मोठा भाऊ अटकेत
दिग्रस : मक्त्याच्या पैशाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना तालुक्यातील खंडापूर येथे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. दिग्रस पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बाळू श्रीराम राठोड (३६) असे मृताचे नाव आहे. वडिलोपार्जीत जमीन कसण्यास अडचण येत असल्याने बाळूच्या आईने गावातील एका व्यक्तीस सदर जमीन मक्त्याने दिली. मुक्त्याचे तीन हजार रुपये आईजवळ होते. हे पैसे बाळूने आईकडे मागितले. त्यावर मोठा भाऊ विनोद श्रीराम राठोड (४०) याने ही रक्कम देण्यास नकार दिला. त्यावरून वाद विकोपास गेला. दारूच्या नशेतील बाळू काहीही ऐकत नव्हता. शेवटी मोठा भाऊ विनोदने घराच्या टीनावरील मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला. बाळू जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस पाटील गजानन राठोड यांनी दिग्रस ठाण्यात माहिती दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश दंदे, रमेश वीर, रूपेश चव्हाण, संतोष चव्हाण घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळावरून विनोदला अटक केली. पोलिसांनी रक्ताने माखलेला दगड जप्त केला. विशेष म्हणजे बाळूच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Small brother's bloodless murder through farming dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.