‘जेडीआयईटी’मध्ये कौशल्य विकास शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:29 IST2018-03-06T23:29:13+5:302018-03-06T23:29:13+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे कौशल्य विकास शिबिर घेण्यात आले.

‘जेडीआयईटी’मध्ये कौशल्य विकास शिबिर
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे कौशल्य विकास शिबिर घेण्यात आले. यात नामवंत कंपनीतील इंडस्ट्रीयल एक्सपर्ट विजयकुमार भांबरी आणि कृतिका भांबरी यांचे मार्गदर्शन लाभले.
या शिबिरामध्ये तज्ज्ञांकडून टू स्ट्रोक, फोर स्ट्रोक आयसी इंजिन, डिझेल इंजिन, टर्बो चार्जेस तसेच रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनिंग विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विविध प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अद्यावत माहिती देण्यात आली. या शिबिरामध्ये विभागातील १५० च्यावर विद्यार्थी सहभागी झाले होते.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे दरवर्षी व्यक्तिमत्व व कौशल्य विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम घेतले जातात. या अंतर्गतच तीन दिवसीय कौशल्य विकास शिबिर घेण्यात आले. अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये मदत होते. यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. अतुल बोराडे यांच्या मार्गदर्शनात ‘मेसा’ समन्वयक प्रा. महेश गोरडे, विद्यार्थी समन्वयक जित सेठ, उपसमन्वयक आकाश जगताप, अश्विन वैद्य, ध्रुव आनंदपारा, सुमित शुक्ला, अतिब शेख, नीलेश जयस्वाल आदींनी पुढाकार घेतला. डॉ. विवेक गंधेवार, डॉ. सचिन भालेराव यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले.