सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर
By Admin | Updated: June 10, 2017 01:08 IST2017-06-10T01:08:16+5:302017-06-10T01:08:16+5:30
जागेच्या दस्तऐवजात दुरुस्ती करावी, या मागणीसाठी खरडगाव येथील १२ नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर
खरडगाव : चार दिवसानंतरही दखल नाही, दस्तऐवजात गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : जागेच्या दस्तऐवजात दुरुस्ती करावी, या मागणीसाठी खरडगाव येथील १२ नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यातील सहा जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. उपोषणाचा चौथा दिवस लोटूनही कुणाकडूनही दखल घेण्यात ंआली नाही.
स्वमालकीची जागा असतानाही खरडगाव येथील १८ लोकांची घरे अतिक्रमणात दाखविण्यात आली. या अन्यायग्रस्तांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर झालेल्या चौकशीअंती तत्कालीन ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र दस्तावेज दुरुस्त करून देण्यात आलेले नाही. ही मागणी घेवून नागरिकांनी संबंधित कार्यालयाचे उंबरठे वारंवार झिजविले. निवेदन सादर करून बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला. यानंतरही कारवाई झाली नाही. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर १२ नागरिकांनी खरडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यातील काही लोकांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.