७२ तासांत सहा शेतकरी आत्महत्या

By Admin | Updated: February 7, 2015 01:47 IST2015-02-07T01:47:07+5:302015-02-07T01:47:07+5:30

नापिकी व कर्जबाजारिपणामुळे एका शेतकऱ्याने स्वत:च्या हाताने स्वत:चे सरण रचून आपली जीवनयात्रा संपविल्याची ही दुसरी घटना दुष्काळग्रस्त विदर्भाने अनुभवली आहे ...

Six farmer suicides in 72 hours | ७२ तासांत सहा शेतकरी आत्महत्या

७२ तासांत सहा शेतकरी आत्महत्या

यवतमाळ : नापिकी व कर्जबाजारिपणामुळे एका शेतकऱ्याने स्वत:च्या हाताने स्वत:चे सरण रचून आपली जीवनयात्रा संपविल्याची ही दुसरी घटना दुष्काळग्रस्त विदर्भाने अनुभवली आहे यामुळे बळीराजाची विपन्नावस्था अधोरेखित हतो असून मागील ७२ तासात आनंदराव पंडागळेसह अमरावतीचे तळणी येथील रामकृष्ण भलावी व गुंजी येथील अंबादास वाहिले तर वर्धा जिल्यातील घोरदचे विजयराव तडस व कान्हेरी येथील नानाजी इंगळे आणि वाशीम जिल्यातील सायखेडा येथील संजयराव गावंडे यांचा या सहा शेतकऱ्यांमध्ये समावेश असल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील मनारखेडच्या काशीराम इंदोरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी स्वत:ची चिता रचून स्वत:च्याच हाताने ती पेटविली होती. आता यवतमाळ जिल्हयातील महागाव तालुक्यातील भांब येथे या घटनेची पुनरावृत्ती झाली. यावर्षी ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतीमालाचे मातीमोल भाव, अभूतपूर्व नापिकी, कजार्चे ओझे त्यातच सरकारची उदासीनता यामुळे नैराश्यात वाढ झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता लक्ष घालावे, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांना दिली आहे .
भांब येथील आनंदराव पंडागळे यांनी खरिप हंगामात पाच एकर कोरडवाहू शेतीत कपाशीची लागवड केली होती. कापसाचे उत्पादन हाती आले की, मोठ्या मुलीचा विवाह पार पाडण्याची स्वप्ने त्यांनी बघितली होती. परंतु दुष्काळामुळे जेमतेम तीन क्विंटल उत्पादन घरी आले. केवळ १२ हजार रुपयात मुलीचा विवाह करू शकत नसल्याची काळजी त्यांना सतावत होती. त्यांना तीन मुली असून, मोठी मुलगी स्नेहा (१८), मधली गायत्री (१५), धाकटी पूजा (१३) व पत्नी सुलोचना यांच्या भवितव्याच्या काळजीने ते चिंताग्रस्त झाले होते. आपल्या राहत्या घरातच त्यांनी स्वत:ला कोंडून घेतले व दाराला कडी लावून अंगावर रॉकेल ओतून आयुष्य संपविले. (प्रतिनिधी)

Web Title: Six farmer suicides in 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.