एकच कर्मचारी दोन ठिकाणी

By Admin | Updated: March 20, 2015 02:01 IST2015-03-20T02:01:31+5:302015-03-20T02:01:31+5:30

राष्ट्रीय शिक्षण संस्था वणीव्दारा संचालित विद्यालयात एकच कर्मचारी दोन ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप.....

Single employee in two places | एकच कर्मचारी दोन ठिकाणी

एकच कर्मचारी दोन ठिकाणी

वणी : राष्ट्रीय शिक्षण संस्था वणीव्दारा संचालित विद्यालयात एकच कर्मचारी दोन ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण सोनारखन यांनी केला आहे.
या संस्थेतर्फे हिवरा-मजरा, मारेगाव रोड, राजूर कॉलरी, बोर्डा आदी ठिकाणी विद्यालय चालविले जाते. त्यात काही कर्मचारी बेपत्ता, तर एक कर्मचारी दोन ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामळे संबंधित कर्मचारी दोन ठिकाणाहून वेतन घेत असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. एस.व्ही.बुचुंडे आणि डी.व्ही.राऊत हे दोन शिक्षक मारेगाव येथे कार्यरत आहे. मात्र ते सत्र २0१४-१५मध्ये बेपत्ता आहे.
जी.व्ही.गजभे नामक शिक्षक राजूर येथून बेपत्ता आहे. जी.बी.बोंतलवार हे शिक्षण सेवक मारेगाव येथे असून राजूर कॉलरी येथेही ते कार्यरत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. एम.जी.सीडाम नामक शिक्षिका राजूर येथे १ फेब्रुवारी २0११ पासून कार्यरत आहे. मात्र त्यांचा नेमणूक दिनांक १९ फेब्रुवारी २0११ आहे. त्यामुळे त्या नेमक्या कोणत्या दिनांकापासून वेतन घेत आहे, असा प्रश्न सोनारखन यांनी उपस्थित केला आहे. ही सर्व माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत मागण्यात आली होती. त्यातून हा घोळ उघडकीस आला आहे.
माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाल्यामुळे संस्थेतील घोळ स्पष्ट झाला. यात नेमकी चूक कोणाची, असा प्रश्न आहे. एकच शिक्षक दोन ठिकाणी कसे कार्यरत राहू शकतात, असा प्रश्न आहे. सोबतच नेमणूक तारीख आणि प्रत्यक्षात कार्यरत असल्याच्या तारखेतही तफावत असल्याने हा प्रकार गंभीर झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Single employee in two places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.