गावकऱ्यांच्या तावडीत चोरटा

By Admin | Updated: March 27, 2015 01:37 IST2015-03-27T01:37:02+5:302015-03-27T01:37:02+5:30

चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेला एक चोरटा गावकऱ्यांच्या तावडीत सापडला तर दोन जण पळून गेले.

Siege of the villagers | गावकऱ्यांच्या तावडीत चोरटा

गावकऱ्यांच्या तावडीत चोरटा

पोफाळी : चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेला एक चोरटा गावकऱ्यांच्या तावडीत सापडला तर दोन जण पळून गेले. ही घटना उमरखेड तालुक्यातील भांबरखेडा येथे बुधवारी रात्री दरम्यान घडली.
जनार्दन मनोहर भोसले (३०) रा. कळमनुरी जि. हिंगोली असे चोरट्याचे नाव आहे. भांबरखेडा येथील श्रीधर रामराव देशमुख यांच्या घरी बुधवारी रात्री तीन चोरटे शिरले. त्यावेळी त्यांच्या मुलाला आवाजाने जाग आली. त्याने आरडाओरडा केला असता गावकरी गोळा झाले. चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोन जण पळून गेले. मात्र जनार्दन भोसले हा गावकऱ्यांच्या तावडीत सापडला. त्याला पकडून पोफाळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून पोफाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना घडल्या असून या चोरट्याच्या अटकेने चोरीच्या घटनांचा शोध लागण्याची शक्यता आहे. पोलीस इतर दोघांचा शोध घेत आहे. (वार्ताहर)

Web Title: Siege of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.